जवळपास १५ दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झाले आहेत. इंडो अमाईन्स कंपनीला सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून कंपनीत जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे.



















