लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाबाबत फेक नरेटीव्ह पसरवलं, असा आरोप महायुती आणि एनडीएकडून केला जात आहे. असं असतानाच आता शरद पवार यांनी संविधानावरचं संकट पूर्णपणे संपलं असा निष्कर्ष काढता येणार नाही, असं महत्त्वाचं विधान केलं आहे. मुंबईत आयोजित महाविकास आघाडीच्या संयुक्त
मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र डागलं.