मुंबईतील लोअर परेल भागातील 15 मजली टाईम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी पहाटे मोठी आग लागली. कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीत सकाळी 6.30 वाजता आगीने पेट घेतला, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाने याला लेव्हल 2 (मोठी) आग म्हणून घोषित केले आहे आणि अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि इतर अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असेही त्यांनी सांगितले.


















