आगामी विधानसभेच्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाची चर्चाही रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पासाठी केलेली सजावट याची आठवण करून देत सूचक विधानही केलं आहे.