कायदा, संविधान आणि नियम याच्या बाहेर कोणी जाऊ नये. विचारधारा वेगळी असू शकते. मतमतांतर असू शकतं. पण ते मांडताना त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होऊन पोलीस खात्याला कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कुणाल कामरा वादावर ते बोलत होते.