पुण्यातील विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचे उदघाटन करण्याचे ठरविले होते.त्यानुसार प्रशासनाच्या माध्यमांतून सर्व तयारी करण्यात आली होती.पण अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा वाजण्याच्या सुमारास हजर झाले आणि काही वेळ अधिकारी वर्गासोबत चर्चा केल्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी कार्यालयाच उदघाटन केले.तर त्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अगोदर दहा मिनिट शिल्लक असताना पोहोचल्या. वेळेच्या आधीच कार्यालयाचं उद्घाटन केल्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अजित पवारांनी कार्यालयाचं पुन्हा उद्घाटन केलं.