Manoharlal Dhakad Viral Video : मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम शारीरिक संबंध बनवणाऱ्या माजी भाजपा नेत्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी रविवारी (२५ मे) अटक केली आहे. तसेच, धाकड यांच्याबरोबर दिसणाऱ्या महिलेचा तपास चालू आहे. दरम्यान, ती महिला नेमकी कोण होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. धाकड यांच्याबरोबर भर रस्त्यात शरीरसंबंध ठेवण्यास ती महिला कशी काय तयार झाली? तिच्यावर जबरदस्ती झाली होती का? की ती स्वतःहून धाकड यांच्याबरोबर गेली होती? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटली असल्याचा दावा केला आहे.