Auto Driver Beaten By Women In Bengaluru: एका महिलेने ऑटो रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेला अटक सुद्धा करण्यात आली. पंखुरी मिश्रा असं तिचं नाव असल्याचं कळतंय. ऑटोरिक्षाचालक लोकेश याला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली व नंतर जामिनावर तिची सुटका सुद्धा झाली.