Bharat Gogavle Targets Sunil Tatkare: मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पनवेल शिवसेनेचे वतीने त्यांचे जंगी सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून आणि हल्लाबोल केला. खासदार सुनील तटकरे यांनी नॅपकिनची स्टाईल केली होती. मात्र, भरत गोगावले यांनी नॅपकिन कशी मी वापरतो? याची स्टाईल आपल्या भाषणातून रंगतदार सांगितले. जो खांद्यावर नॅपकिन टाकतो तो हॉटेलमधला वेटर असतो. जो हृदयापाशी नॅपकिन ठेवतो म्हणजे गोरगरिबांचे मला आशीर्वाद असतात.