Auto Rickshaw Driver Beaten By MNS Workers: मुलुंड चेकनाका परिसरात एका रिक्षा चालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या संबंधित ऑटोरिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप देत माफी मागायला लावली आहे. एका मनसे कार्यकर्त्याने ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडिओ शूट केल्यावर हे प्रकरण समोर आलं.