पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू हे आठवड्याभरापासून उपोषणाला बसले आहेत. त्यावर सरकार काय भूमिका घेणार. तुम्ही दिलेला शब्द पाळणाऱ का असा जाब विचारला. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना बाहेर काढत पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं.













