स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहेत. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत मतदार याद्यांच्या घोळावरून प्रश्न विचारण्यात आले. त्यावर आयोगानं सारवासारव करत दिलेल्या उत्तरावरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.





















