scorecardresearch

आम आदमी पार्टी News

आम आदमी पक्ष (AAP) हा एक राजकीय पक्ष असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी २०११ साली झालेल्या सत्तारूढ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित केंद्र सरकारविरोधातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनंतर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. देशात पंजाब राज्य आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आप पक्षाची सरकार आहे.


दिल्लीची धुरा सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाहत आहेत, तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंतसिंग मान या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.

झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. आप पक्षाने २०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. यात आप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पक्षाने काँग्रेसच्या समर्थनाने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केली होती. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार ४९ दिवसच सत्तेवर राहिले. काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने केजरीवाल यांना विधानसभेमध्ये जन लोकपाल विधेयक मंजूर करता आले नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सत्ता सोडली.


२०१५ च्या निवडणुकीत केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत मिळाले. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ६७ जागांवर त्यांना विजय मिळाला आणि केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. विजयाची ही घोडदौड पुढेही सुरू राहिली. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकत आप पक्ष पुन्हा सत्तेवर आला.


दिल्लीच्या बाहेरही आप पक्षाला आपले अस्तित्व निर्माण करता आले. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाने २० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. सध्या आप पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबर निवडणूक लढविली होती. ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आपने ४ जागांवर तर काँग्रेसने ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या चार जागांवर आप पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.


Read More
Anmol Gagan Maan Resigns As Punjab AAP MLA
आपच्या आमदाराचा राजीनामा, राजकारणालाच रामराम!

AAP MLA Resignation पंजाबच्या खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार आणि पंजाबी गायिका अनमोल गगन मान यांनी राजकारणातून निवृत्तीची…

AAP district president Mayur Raikwar booked for posing as a fake journalist and demanding extortion
बनावट तोतया पत्रकार बनून खंडणीची मागणी; आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व अर्जुन धुन्ना विरुद्ध गुन्हा

यामध्ये आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे (३६), संगिता बादल दुबे (२७ ) दोन्ही रा. रेंगेपार ता. साकोली जि. भंडारा व अजय…

  Aam Aadmi Party Pune to contest local elections independently to field new candidates pune print
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘आप’ स्वबळावर

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) स्वबळावर लढणार आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी बुधवारी पत्रकार…

Anti Sacrilege Bill: धर्मग्रंथांचा अवमान केल्यास पंजाबमध्ये जन्मठेपेची शिक्षा, १० लाखांचा दंड; काय आहे हे विधेयक?

Anti Sacrilege Bill: हे विधेयक सर्व धर्मांना लागू होते आणि राज्यात वर्षानुवर्षे होणाऱ्या धार्मिक अवमानाच्या घटनांनंतर एक कठोर संदेश देण्याचे…

Arvind Kejriwal Nobel Prize Remark
Arvind Kejriwal: “मलाही नोबेल मिळायला पाहिजे”, केजरीवालांच्या मागणीची भाजपाकडून खिल्ली; म्हणाले, “मानसिक आरोग्य…”

Arvind Kejriwal Nobel: केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीत आमचे सरकार सत्तेत होते तेव्हा आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री म्हणून…

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (छायाचित्र पीटीआय)
गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या आमदाराला तडकाफडकी अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

Gujarat AAP Mla Arrested : गुजरातमधील डेडीयापाडा मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे आमदार चैतार वसावा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Sardarji-3: दिलजीत दोसांजच्या चित्रपटाला भारतात विरोध, भारतातील नेत्यांचा मात्र कलाकाराला पाठिंबा

दिलजीतच्या चित्रपटावरून वाद सुरू झाल्यावर भाजपा नेते सर्वांत आधी त्याच्या बचावासाठी सरसावले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने पाकिस्तानी…

_Sanjeev Arora gets industries NRI affairs ministry Dhaliwal dropped from Punjab cabinet
पहिल्यांदाच आमदार झालेल्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद, त्यावरून निर्माण झालेला वाद काय? कोण आहेत संजीव अरोरा?

Sanjeev Arora gets industries NRI affairs ministry पहिल्यांदाच आमदार झालेल्या संजीव अरोरा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (छायाचित्र पीटीआय)
विजयाचा गुलाल फिका पडायच्या आधीच ‘आप’ने दोन आमदारांची केली हकालपट्टी; नेमकं कारण काय?

AAP Suspends Two MLAs : गुजरात व पंजाब विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आम आदमी पार्टीने दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (छायाचित्र पीटीआय)
गुजरामधील विजयानंतर ‘आप’ने ७२ तासांतच केली आमदाराची हकालपट्टी; कारण काय? प्रीमियम स्टोरी

MLA Umesh Makwana News : गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने ७२ तासांतच आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली.

Wardha District Aam Aadmi Party , Aam Aadmi Party Shrikant Dod, Wardha District Aam Aadmi Party Meeting,
राज्यात ‘आप’ स्वबळावर लढणार, कोणत्याच पक्षाशी युती नाही, एकला चलो रे निर्धार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर राजकीय हालचाली वेगात वाढल्या. स्थानिक पुढाऱ्यांनी कंबर कसली.

ताज्या बातम्या