scorecardresearch

अजिंक्य रहाणे News

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
team india
Ind vs Eng: अजिंक्य रहाणेचा प्लॅन; चौथ्या कसोटीत हा महत्वाचा बदल करण्याचा दिला सल्ला

Ajinkya Rahane On Team India: भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने चौथ्या कसोटीआधी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

ajinkya rahane
Ajinkya Rahane: क्रिकेटच्या पंढरीत अजिंक्यने जागवल्या डोंबिवली -CSMT प्रवासाच्या आठवणी; पाहा Video

Ajinkya Rahane Interview: भारतीय संघातील स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर डोंबिवली ते सीएसएमटी प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आहेत.

ajinkya rahane
Ind vs Eng: “मला भारतासाठी खेळायचंय….”, या भारतीय खेळाडूने सांगितली मनातली इच्छा

Ajinkya Rahane On His Comeback: भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने भारतीय संघात कमबॅक करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

rohit sharma ajinkya rahane
Rohit Sharma Retirement: रोहितचा कसोटी क्रिकेटला रामराम, अजिंक्य रहाणेला धक्काच बसला! म्हणाला, “माझ्यासाठी हा निर्णय म्हणजे..”

Ajinkya Rahane On Rohit Sharma Retirement: भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर, अजिंक्य रहाणेला आश्चर्याचा धक्का…

suryakumar yadav
T20 Mumbai League: टी-२० मुंबई लीगचे ऑक्शन केव्हा आणि किती वाजता सुरू होणार? खेळाडूंची बेस प्राईज किती? पाहा संपूर्ण अपडेट

T20 Mumbai League Auction: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे ऑक्शन केव्हा आणि कुठे…

ajinkya rahane
Ajinkya Rahane: हाताला दुखापत असतानाही अजिंक्य रहाणेने डाईव्ह मारली अन् भन्नाट झेल घेतला; वैभव पाहतच राहिला – Video

Ajinkya Rahane Catch Video: कोलकाता नाईट रायडर्स संघर्ष कर्णधार अजिंक्य रहाणेने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

kkr
KKR vs RR Highlights: केकेआरने राजस्थानच्या तोंडचा घास पळवला! शेवटच्या चेंडूवर कोलकाताचा थरारक विजय

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Highlights: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने केवळ १ धावेने…

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live Match Score Updates in Marathi
IPL 2025 KKR vs RR Highlights: केकेआऱच्या अखेरच्या चेंडूवर विजय, राजस्थानचा एका धावेने पराभव

IPL 2025 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Highlights: केकेआरने अखेरच्या चेंडूवर राजस्थानचा एका धावेने पराभूत करत आयपीएलमधील आपले आव्हान…

Batsman Ajinkya Rahane has stated that he wants to play for the Indian team again
देशासाठी खेळण्याचेच ध्येय! अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे पुनरागमनाबाबत आशावादी

मला हा मान यापूर्वी मिळाला आहे. मात्र, मी पूर्णपणे समाधानी नाही. मला पुन्हा भारतीय संघाकडून खेळायचे आहे. मी पुनरागमनाची आशा…

Mumbai cricket league 2025 news in marathi
ट्वेन्टी-२० मुंबई लीगमध्ये तारांकितांचा सहभाग; सूर्यकुमार, श्रेयस, रहाणे ‘आयकॉन खेळाडू’

या स्पर्धेसाठी शिवम दुबे, सर्फराज खान, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि तुषार देशपांडे हे अन्य ‘आयकॉन खेळाडू’ असतील.

kolkata knight riders vs Gujarat titans
KKR vs GT Highlights: गुजरात एक्स्प्रेस सुसाट! केकेआरला घरच्या मैदानावर पराभूत करत मिळवला शानदार विजय

KKR vs GT, IPL 2025: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने शानदार विजयाची…

ताज्या बातम्या