scorecardresearch

अनिल देशमुख News

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.


१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. १०० कोटी वसुलीप्रकरणात अनिल देशमुख बरेच महिने तुरुंगात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ केली.


Read More
anil deshmukh claims forensic report ignored due to fadnavis pressure
फडणवीसांचा दबाव कामाला आला? देशमुखांनी आणला फॉरेन्सिकचा खरा चेहरा समोर

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पत्रकार परिषदेत…

anil deshmukh
माजी गृहमंत्री देशमुख फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, सरकारवर गंभीर आरोप

नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख यांनी फॉरेन्सिक अहवालाचा उल्लेख करत धक्कादायक आरोप सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर केला आहे.

attack on NCP Sharad Pawar faction leader anil deshmukh during polls was fake
माजी गृहमंत्री देशमुख हल्ला बनावट, ग्रामीण पोलिसांचा न्यायालयात अहवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला हल्ला बनावट होता, असा…

anil Deshmukh bjp rss news
भाजप-संघाच्या विचारसरणीला उत्तर देणारी पदयात्रा – अनिल देशमुख

नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेचा उद्देश फक्त चालणे नव्हे, तर संविधान रक्षणाची चळवळ उभारणे आहे.

Nagpur save constitution march tushar gandhi mahavikas aghadi from dikshabhoomi sevagram
‘हरे राम हरे कृष्ण, वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून तुषार गांधी यांची पदयात्रा सेवाग्राम कडे निघाली

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रा ‘वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून सेवाग्रामकडे…

Home Minister Anil Deshmukhs demand to Chief Minister Devendra Fadnavis
संत्री, सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे का नाही?

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात भाताचे पीक अनेक दिवसांपासून पाण्याखाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातून पाणी निघत नाही. पाणी साचून राहिल्याने धानाचे पीक…

BJP's mindset exposed due to Padalkar's abusive language; Deshmukh's anger
पडळकरांच्या अर्वाच्य भाषेतील टीकेमुळे भाजपची मानसिकता उघड; देशमुखांचा संताप

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या अर्वाच्य भाषेत टीका केली.

safety audit needed for explosive factories in Nagpur says anil Deshmukh
Anil Deshmukh: दारुगोळा कंपनीत वारंवार स्फोटामुळे कामगारांचे मृत्यू… माजी गृहमंत्री कारणांबाबत थेटच म्हणाले…

नागपुरातील बाजारगाव परिसरात मोठया प्रमाणात एक्सप्लोझिव्ह कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला…

one died in the solar explosion case
सोलार स्फोट प्रकरणात मोठी अपडेट: आणखी एकाचा मृत्यू.. केंद्रीय यंत्रणेकडून तपासणी…

बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात मयूर गणवीर (२५ रा. चंद्रपूर) या कंपनी…

Anil Deshmukh visit a solar company
Nagpur Factory Blast 2025 : बॉम्ब बनवणाऱ्या खासगी कंपनीत नऊ महिन्यांत दुसऱ्यांदा स्फोट, काय आहे कारण?

Nagpur Factory Blast 2025 बुधवारी मध्यरात्री सोलार कंपनीत झालेला स्फोट हा भीषण होता. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून जवळपास…

Anil Deshmukh
अमेरिकन टेरिफच्या नावाखाली कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी-अनिल देशमुख

अमेरिकेने वाढवलेल्या टेरिफमुळे भारतातील कापडाच्या निर्यातीवर परिणाम होऊ नये म्हणून कापसाचे आयात शुल्क माफ केले आहे. त्याचा फायदा कापड उद्योगांना…

ताज्या बातम्या