scorecardresearch

अनिल देशमुख News

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेले देशमुख युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य अशी विविध खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.

१९९९ साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर देशमुखांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर १९९९ आणि २००४ साली काटोल मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) तत्कालीन उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून अनिल देशमुखांचा काटोलमधून पराभव झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांनी पुन्हा काटोलमधून निवडणूक जिंकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं.
Read More
Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…

बाहेर जिल्ह्यातील नेत्यांवर जिल्हा सोडण्याचे आदेश आहे. पण तरीही भाचा अमर काळे यांच्यासाठी आज दुपारी हजर झालेले त्यांचे मामा अनिल…

Anil Deshmukh Sunil Kedar and Abhijit Vanjari Hastily Deported From Wardha District
अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण…

अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आमदार अभिजित वंजारी हे तीन बडे नेते १५ दिवसांपासून मुक्कामी होते.

anil deshmukh
मराठा आरक्षणावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले ” सरकार दिशाभूल करीत आहे”

अनिल देशमुख प्रसार माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली  आहे,  त्यामुळे त्यांनी आंदोलनाची  घोषणा केली आहे.

Sharad Pawar ANil Deshmukh FB
“…तेव्हा फुटलेल्या आमदारांची घरवापसी होईल”, अनिल देशमुखांनी सांगितल्या शरद पवार गटातील पडद्यामागच्या हालचाली

निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

vidhan bhavan farmer suicide latest news in marathi, ncp leader anil deshmukh news in marathi
विधानभवनात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

सचिन बहादूरे या शेतकऱ्याने मंगळवारी विधानभवन परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Anil Deshmukh on Ajit Pawar statement
“अजित पवार मला कोणतेही खाते द्यायला तयार होते”, अनिल देशमुख म्हणाले, ८३ वर्षांच्या बापाला…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चंद्रपूरात होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला.