scorecardresearch

बहुजन विकास आघाडी

बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aaghadi BVA) ही राजकीय आघाडी असून ती महाराष्ट्रातील वसई विरार भागामध्ये कार्यरत आहे. २००९ मध्ये तिची स्थापना झाली होती. या आघाडीला पूर्वी वसई विकास आघाडी असे संबोधले जात होते. माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे या आघाडीचे संस्थापक आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने पालघर मतदारसंघात विजय मिळवला होता. या जागेवरून बळीराम जाधव यांनी लोकसभा गाठली होती. बळीराम जाधव यांच्या रुपाने पक्षाला त्याचा पहिला संसद सदस्य मिळाला होता.


२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला दोन जागा जिंकण्यात यश आले होते. पक्षाने बोईसर आणि नालासोपारा या दोन जागांवर विजय मिळवला होता. बोईसर येथून विलास तारे तर नालासोपारा येथून क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या निवडणुकीत बोईसर आणि नालासोपारासह वसई मतदारसंघात विजयी पताका फडकवला होता. वसईतून हितेंद्र ठाकूर यांना विजय मिळाला होता.


बहुजन विकास पक्षाने २०१५ च्या वसई विरार महापालिका निवडणुकीतही चमकदार कामगिरी केली होती. पक्षाचे १०६ सदस्य निवडून आले होते. बहुजन विकास आघाडीच्या प्रविणा ठाकूर या वसईच्या पहिला महिला महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने आपले बालेकिल्ले जपण्यात यश मिळवले होते. बोईसर, नालासोपारा आणि वसईत पक्षाला पुन्हा विजय मिळाला होता.


बहुजन विकास आघाडी ही वसई विरार भागात प्रभावी असून महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तिने राजकारणातील आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत.


Read More
Bahujan Vikas Aaghadi President Hitendra Thakur's attack on BJP
Hitendra Thakur Slams BJP: प्रश्न निवडणूक आयोगाला.. उत्तर भाजपचे.. हितेंद्र ठाकूरांचा भाजपला टोला… केले गंभीर आरोप

बहुजन विकास आघाडीने ही शहरातील विविध ठिकाणच्या भागात कार्यकर्ता संवाद बैठका सुरू केल्या आहेत.

Nalasopara bahujan vikas aghadi party bike rally
Vasai Virar Politics: बविआमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश, बाईक रॅली काढत केले शक्तिप्रदर्शन

नालासोपारा मधील विविध पक्षाचे प्रमुख व सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश केला. यावेळी बाईक रॅली काढत…

aachole hospital project land row triggers bjp bva clash in vasai
Video : आचोळे रुग्णालयाच्या सर्वेक्षणा दरम्यान भाजप – बविआत वाद

या वादाची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले.

objectionable video of BVA worker circulated
बविआ कार्यकर्त्याची आक्षेपार्ह चित्रफित प्रसारीत, भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याची आक्षेपार्ह चित्रफित तयार करून ती समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांविरोधात नालासोपारा पोलीस…

vasai BVA Activists Potholes Challenge VVMC Bad Roads Diwali Lamps Protest
खड्ड्यांमध्ये दिवे लावत बविआ कार्यकर्त्यांनी केला पालिकेच्या खड्डेमुक्तीच्या आश्वासनाचा निषेध…

Bahujan Vikas Aghadi, BVA : गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आश्वासन देऊनही रस्ते दुरुस्त न झाल्याने बविआ कार्यकर्त्यांनी नायगावमध्ये खड्ड्यांमध्ये दिवे लावत महापालिकेचा…

Bahujan Vikas Aghadi Leaders Join BJP BVA Shock Ahead Municipal Elections Vasai
तीन दशकांच्या वर्चस्वाला ‘फुटीचे’ ग्रहण! वसई-विरारमध्ये बविआचे शिलेदार भाजपच्या गोटात…

Bahujan Vikas Aghadi BVA : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये…

Protest by lighting lamps and making rangolis in the pits on the first day of Diwali
वसई : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यांमध्ये रांगोळी, दिवे लावून आंदोलन

पावसाळ्यापासून वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था…

duplicate names in voter list in vasai virar
वसई, विरार मधील मतदार याद्यांत घोळ ? एकाच मतदाराची नावे अनेक ठिकाणी असल्याचा आरोप

वसई विरार मधील एकाच मतदारांची नावे अनेक ठिकाणी असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी दुबार नावे शोधून…

BJP Vasai entry, Mahesh Patil BJP, Bahujan Vikas Aghadi leader switch, Vasai political news, Vasai municipal elections, BJP party expansion Maharashtra,
बविआला आणखी एक धक्का, नाराज महेश पाटील अखेर भाजपमध्ये

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी मंगळवारी भाजप मध्ये प्रवेश केला.

vasai virar residents protest against power cuts high bills msedcl vasai virar electricity issues
वीज समस्येबाबत नागरिक आक्रमक; महावितरण विरोधात विरार मध्ये मोर्चा

वीज समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वात रविवारी सकाळी विरार येथे मोर्चा काढला होता. यात माजी आमदार क्षितीज…

ward structure plan for vasai virar elections submitted
निवडणुकीचे संकेत मिळताच राजकीय पक्ष सरसावले, वसई विरार मध्ये राजकीय पक्ष सक्रिय

२०१४ साली निवडणूक पार पडली त्यात ११५ जागा पैकी १०५ नगरसेवक बविआचे निवडून आणून एका हाती सत्ता मिळविली होती. तर…

How much will the strength of the India Front increase due to BSP
बसपच्या हत्तीला पुन्हा विरोधकांच्या तंबूत आणण्याची धडपड? बसपमुळे इंडिया आघाडीची ताकद किती वाढेल?

लोकसभा निवडणुकीत बसपला ९.४६ टक्के मते मिळाली. भाजपला ४१.६७ टक्के मतांसह उत्तर प्रदेशात ३३ खासदार निवडून आणता आले. समाजवादी पक्षाने…

संबंधित बातम्या