scorecardresearch

बॅंक Photos

बॅंक ही आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणारी संस्था आहे. बॅंकेद्वारे खाते उघडण्यापासून ते ऑनलाइन बॅंकींगपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देण्यात येतात. स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना व्यवहार करताना बॅंकेची मदत होते. कर्ज काढण्यासाठीही बॅंक योग्य पर्याय समजला जातो. युरोप खंडामध्ये बॅंक संकल्पना उदयास आली. भारतामध्ये मौर्य काळामध्ये बॅंकांप्रमाणे एक प्रणाली आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली जात होती असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर बॅंक या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. भारत पारतंत्र्यामध्ये असताना ब्रिटीशांद्वारे देशामध्ये ही संकल्पना पोहचवली गेली. १७७० मध्ये भारतामधील पहिली बॅंक ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ ही सुरु झाली. पुढे काही वर्षांनी १८२६ मध्ये ती बंद पडली. जून १८०६ मध्ये कोलकातामध्ये ‘बॅंक ऑफ कलकत्ता’ची स्थापना करण्यात आली. पुढे १८०९ मध्ये तिचे नाव बदलून ‘बॅंक ऑफ बंगाल’ करण्यात आले. तेव्हा ब्रिटीशाच्या राजवटीमध्ये असलेल्या भारताचे बॉम्बे, मद्रास आणि बंगाल या तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. यातील बंगाल प्रांतामध्ये ‘बॅंक ऑफ बंगाल’ ही बॅंक प्रस्थापित करण्यात ब्रिटीशांना यश आले होते. त्यांनी १८४० मध्ये ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि १८४३ मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ या दोन बॅंकाची स्थापना केली. व्यवहार सोप्पा व्हावा यासाठी १९२१ मध्ये तिन्ही प्रांतांमधील बॅंका एकत्र करुन ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५५ मध्ये ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ असे ठेवण्यात आले. भारतामध्ये सध्या एसबीआयसह असंख्य बॅंका सुरु आहेत. Read More
home-loan759
9 Photos
Loan Guarantor: कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची हमीदार होण्यापूर्वी ‘या’ बाबी लक्षात ठेवा, अन्यथा…

एकदा हमी घेतली की आपली बँकेप्रती जबाबदारी वाढते. कारण मित्राने कर्जाचे हफ्ते फेडले नाही. तर बँकेचा तगदा आपल्या मागे लागतो.

bank holiday may 2022
12 Photos
Photos : मे महिन्यात १० दिवस बॅंक राहणार बंद; महत्त्वाच्या कामांचे करा वेळीच नियोजन

तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

Rules Changes From March
15 Photos
Rules Changes From March: LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ मार्चपासून बदलणार!

१ मार्चपासून एलपीजीच्या किमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत होणाऱ्या या मोठ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

7 Photos
२०२२ मध्ये एकूण २५ सार्वजनिक सुट्ट्या, ८ वेळा शनिवार किंवा रविवार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर…

नोकरदार व्यक्ती म्हटलं की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्याही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच त्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांचीही…