scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Bjp leader Shazia Ilmi on aam aadmi party
“मी आम आदमी पक्षात असते तर तुरुंगात असते,” भाजपा नेत्याचा दावा; नक्की काय म्हणाल्या?

BJP Muslim spokesperson पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शाझिया इल्मी या आपल्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत.

majority maratha suicides during bjp shivsena rule nanded
मराठा आरक्षणासाठी बहुतांश आत्महत्या युती – महायुतीच्या राजवटीत ! नांदेड जिल्ह्यातील चित्र; सात वर्षांमध्ये एका मुलीसह ३० जणांचे बलिदान…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या.

congress launches Vote Chor Gaddi Chhod
वोट चोर गद्दी छोड मेळाव्यावर स्थानिक स्वराज्य निवडणुकीची छाप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका लेखात केला. त्यात कामठी मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. त्यानंतर…

All-party celebrations in Nashik after Maratha reservation decision
Manoj Jarange Patil Protest End : मराठा आरक्षण निर्णयानंतर नाशिकमध्ये सर्वपक्षीय आनंदोत्सव…शिवसेना शिंदे गटात शांतता

सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयांचा भाजपकडून आनंदोत्सव साजरा झाला. शिवसेना शिंदे गटाच्या गोटात मात्र शांतता…

Congress yatra, Chandrashekhar Bawankule, Kamthi Constituency, Vote Chore Gaddi Chhod, Kamthi election protest,
भाजप नेते बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेसचे आज जोरदार शक्तिप्रदर्शन, ‘व्होट चोर गद्दी छोड’ यात्रा….

भाजप नेते व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेसची आज ”व्होट चोर गद्दी छोड’ संघर्ष यात्रा निघत आहे.

pmc draft ward delimitation objections cross 1300 mahavikas aghaadi challenges in court
जागरुक पुणेकरांची कमाल… एका दिवसात प्रारूप प्रभाग रचनेवर आल्या ‘एवढ्या’ हरकती !

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत.

bjp targets satej patil over kalammavadi water project ahead kolhapur municipal elections
कोल्हापूरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर राजकारण पेटले, सतेज पाटील यांची कोंडी करण्याची भाजपची खेळी

या माध्यमातून भाजपने काळम्मावाडी योजना आणि सतेज पाटील यांना केंद्रस्थानी ठेवत कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

political family feud continues in india with kcr family dispute other dynastic conflicts
देशातील आणखी एका राजकीय घराण्यात कलह; वडिलांनी केली मुलीची हकालपट्टी

देशातील राजकीय घराण्यांमधील बेबनाव किंवा कलह नवीन नाही. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीतमध्येही असेच वितुष्ट निर्माण झाल्याने वडिलांनी आमदार असलेल्या मुलीला…