Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

भारतीय जनता पार्टी Videos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Ebhoomipujan of Textile Park by PM Narendra Modi Navneet Rana get emotional at that moment
Navneet Rana: मोदींच्या हस्ते टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; नवनीत राणा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

Naredra Modi criticized Congress party over politics
Narendra Modi: “त्यांनी गणपतीच्या मूर्तीला पोलिसांच्या व्हॅनमध्ये ठेवलं”; मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणातून नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा…

Sanjay Rauts press conference Live
Sanjay Raut Live: सरकारवर टीका अन् जागावाटपाचा मुद्दा; संजय राऊत यांची पत्रकार परिषद Live

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच मविआच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर देखील…

central cabinet approves one nation one election proposal know how it will work
One Nation One Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अन् एक देश, एक निवडणूक चर्चा; प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे माजी…

Majhi Ladki Bahin Yojana will not be closed for 5 years
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 5 वर्षे बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी तसेच बुलढाण्यातील विविध चौकात, मुख्य परिसरात महापुरुष, संत महात्मे यांच्या कमीअधिक वीस पुतळ्यांच्या व…

Sharad Pawar gave a reaction on Ladaki Bahin Yojana
Sharad Pawar On Ladki Bahin: गावोगावीच्या लाडक्या बहिणींची तक्रार काय? शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar On Ladki Bahin: लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात येत आहेत. पात्र महिलांना हे पैसे सरकारतर्फे…

Chaos in saree distribution program organized by BJP in Pune
Pune: भाजपाकडून आयोजित साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ; साड्या न मिळाल्याने महिलांनी व्यक्त केला संताप

आज (१८ सप्टेंबर) जगापूर येथे मनाठा सर्कलमध्ये भाजपाकडून महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनाठा…

Amruta Fadnavis shall be called Ma Not Madam Says Mumbai BJP Leader Mangal Prabhat Lodha After Ganpati Visarjan Cleaning at Versova
Amruta Fadnavis: मंगलप्रभात लोढा म्हणतात, अमृता फडणवीसांनी राजकारणातला कचरा स्वच्छ करावा!

Amruta Fadnavis: दिव्याज फाऊंडेशनने वर्सोवा येथे सकाळी साडेसहा वाजता समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात…

Rashmi Thackeray Supriya Sule can Become First Maharashtra Chief Minister Says Congress MP Varsha Gaikwad Check Reactions
Maharashtra CM: महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान कुणाला? रश्मी ठाकरेंची चर्चा

Varsha Gaikwad: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले. यामुळे महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास…

Marath Leader Manoj Jarange Patil on Maratha Reservation and criticized BJP
Manoj Jarange on Reservation: भाजपामधील माकडं, जरांगेंची बोचरी टीका

मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्या मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज…

ताज्या बातम्या