scorecardresearch

भारतीय जनता पार्टी Photos

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
rahul gandhi on pm modi
9 Photos
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान; म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर भाष्य करताना दिसत नाहीत.” असेही राहूल गांधी म्हणाले.

pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

Congress leader Rahul Gandhi
10 Photos
शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा; म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली

bacchu kadu on rana
11 Photos
Lok Sabha Election 2024 : मैदान प्रकरणाच्या राड्यानंतर अमरावतीमध्ये बच्चू कडूंची सभा; राणांवर जोरदार टीका!

अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात संघर्ष पेटला होता.

ताज्या बातम्या