scorecardresearch

भारतीय जनता पार्टी News

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
udyan raje Bhosle, satara lok sabha seat, Prime Minister Narendra Modi expressed belief udyan raje victory, Narendra modi in karad, Narendra modi campaign for udyanraje Bhosale, lok sabha 2024, Narendra modi criticize congress, Narendra modi, Narendra modi news, marathi news,
सातारामध्ये उदयनराजेंच्या विजयाचा भगवा फडकेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले हे भाजपने उमेदवार दिलेत. साताऱ्यात पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल, असा…

pm Narendra Modi, pm Narendra Modi Vows to Protect Constitution, karad public meeting, Narendra Modi Rejects opponents allegation, Narendra modi in karad, Narendra modi campaign for udyanraje Bhosale, satara lok sabha seat, lok sabha 2024, Narendra modi criticize congress, Narendra modi,
मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही – नरेंद्र मोदी

काँग्रेसला मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही आणि ते धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्नही करू शकणार नाहीत, असे ठणकावून…

narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती

महाराष्ट्रात ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र…

Stone pelting, Stone pelting at Mihir Kotecha s campaign, north east Mumbai Mumbai lok sabha seat, Stone pelting at Gowandi, Mihir Kotecha s campaign gowandi, Mumbai news, lok sabha 2024, election news, marathi news, mohor Kotecha news, bjp,
मुंबई : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक

ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारावेळी आज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात…

PM Narendra Modi Interview
विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खटले रद्द होतात का? मोदी म्हणाले, “एकही केस…”

ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सरकारवर करण्यात येत आहे. यावर आता खुद्द पंतप्रधान…

Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj News
शांतीगिरी महाराजांचा शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज? छगन भुजबळ म्हणतात, “नाशिकच्या जागेवर…”

नाशिक मतदारसंघात अचानक ट्वीस्ट आला आहे. शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे.

PM Narendra Modi In Satara
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसला इशारा; म्हणाले, “कान उघडे ठेवून ऐका…”

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कराडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया…

udayan raje bhosale narendra modi latest marathi news
Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…

उदयनराजे भोसले म्हणाले, “जेव्हा देशातले सामान्य माणसं मोठ्या प्रमाणावर न्याय्य हक्कांची मागणी करू लागले, तेव्हा त्यांना वाटायला लागलं की हे…”

Abhijit Patil Meet Devendra Fadanvis
भाजपात जाणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले, “कारखाना वाचवायचा…”

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत अभिजित पाटील…

SP and BSP gave chance
भाजपाच्या पराभवासाठी सपा अन् बसपाने जाटव दलित उमेदवारांना दिली संधी; आग्रा कोण जिंकणार?

समाजवादी पक्ष-काँग्रेस आणि बसपा या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे सुरेश चंद कर्दम आणि पूजा अमरोही या जाटव दलित उमेदवारांना मतदारसंघातून निवडणुकीच्या…

uddhav thackeray eknath shinde
“आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ४० आमदार बंडखोरी करून सुरतला गेलेले असताना पडद्यामागे काय-काय घडत होतं? यावर मुख्यमंत्र्यांनी…