scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारतीय जनता पार्टी Videos

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
Radhakrishna Vikhe Patil has responded to Rohit Pawars allegations against the government over Maratha reservation
मराठा आरक्षणावरुन रोहित पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला विखेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Radhakrishna Vikhepatil: मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर रोहित पवार…

OBC community leader Laxman Hake got angry as Manoj Jarange ended his hunger strike
laxman hake: “जीआरमधील शेवटचा पॅरेग्राफ…”; जरांगेंनी उपोषण सोडताच हाके संतापले

laxman hake: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरणासाठी मुंबईत ५ दिवस केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य…

Deputy Chief Minister Eknath Shindes reaction after Manoj Jarange ended his hunger strike
Eknath Shinde: मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde: मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं.…

Chief Minister Devendra Fadnavis reaction after Manoj Jarange ended his hunger strike
Devendra Fadnavis: “मराठा समाजासाठी…”; जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी पाच दिवस आंदोलन केल्यानंतर अखेर उपोषण सोडले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया…

What did Supriya Sule say after meeting Manoj Jarange
Supriya Sule in Pune: जरांगेंना भेटल्यानंतर काय घडलं? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानात मनोज जरांगेंची भेट घेतली. ही भेट घेऊ परतताना…

Deputy Chief Minister Eknath Shindes counterattack on Raj Thackerays statement
Eknath Shinde on Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर, एकनाथ शिंदेंचा पलटवार

हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज…

Manoj Jarange Patils appeal to Maratha protesters
Manoj Jarange Patil: आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

मनोज जरांगे पाटील यांचं शुक्रवार पासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पाणी, जेवण याची गैरसोय झाल्याने आंदोलकांनी संताप…

ताज्या बातम्या