scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कॅमेरून ग्रीन Videos

कॅमेरून ग्रीन (Cameron Green) हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. तो फलंदाजीसह गोलंदाजी देखील करतो. डिसेंबर २०२० मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने ५ एप्रिल २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-२० सामने खेळायला सुरुवात केली. इंडियन प्रीमिअयर लीगच्या सोळाव्या हंगामाआधी झालेल्या ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. पुढे १७.५ कोटी रुपये बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला संघामध्ये सहभागी करवून घेतले.

आयपीएल २०२३ (IPL 2023) ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचा दुसरा क्रंमाक लागतो. या लिलावामधला कॅमेरून ग्रीन हा सर्वात जास्त बोली लागलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे.

Read More