scorecardresearch

छगन भुजबळ News

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Girish Mahajan has once again tried to provoke Bhujbal
विखे पाटलांच्या आडून भुजबळांना डिवचण्यात गिरीश महाजन यशस्वी…!

महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अजूनही मिटलेला नाही. सुरtवातीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी निश्चित झाले…

Chhagan Bhujbal news
कुंभमेळ्यात कमाल गर्दीच्या वेळी नाशिक विमानतळावर… छगन भुजबळांचे राजनाथ सिंह यांना साकडे

नाशिक येथे विद्यमान धावपट्टीला समांतर धावपट्टी बांधण्यासाठी ३४३.२ कोटींची निविदा मागवली गेली आहे. दुहेरी वापर क्षमता,लष्करी पायाभूत सुविधा आणि विविध…

Radhakrishna vikhe patil
ओबीसी आरक्षण कमी होणार याचे काही पुरावे आहेत का? विखे पाटील यांचा छगन भुजबळ यांना सवाल

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

Satej Patil Duplicate Voter Names Maharashtra Criticizes Election Commission
आयोगाने ठरवल्यास राज्यातील दुबार नावे दूर होतील – सतेज पाटील

Satej Patil : निवडणूक आयोगाने दक्ष राहून काम केल्यास महाराष्ट्रातील एक कोटीपेक्षा अधिक दुबार नावे मतदारयादीतून सहज दूर होऊ शकतील,…

Maharashtra-Politics-Top-statements
Maharashtra Politics : ठाकरे बंधुंची युती पक्की ते वडेट्टीवार भुजबळांच्या पाया पडायलाही तयार, दिवसभरातील ५ महत्वाची राजकीय विधाने काय? वाचा!

राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते जाणून घेऊयात.

Chhagan Bhujbal inaugurated the Yeola Agricultural Produce Market Committee office
येवल्यातील कृषिमाल देशात पाठविण्यासाठी …छगन भुजबळांनी काय योजना आखली ?

यावेळी त्यांनी येवला तालुक्याचा कृषी माल केवळ राज्यातच नव्हे तर, देशाच्या विविध भागात पोहोचावा, यासाठीही चाललेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Vijay Vadettiwar
शासन निर्णय रद्द झाला तर भुजबळांच्या पाया पडेन – वडेट्टीवार

आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जर खरंच २ सप्टेंबरचा ओबीसीविरोधी शासन निर्णय रद्द होणार असेल, तर मी…

congress leader Vijay wadettiwar
फडणवीस एकाचवेळी ओबीसी, मराठ्यांना न्याय देत असतील, तर मग मोर्चे कशासाठी? – वडेट्टीवारांचा भुजबळांना सवाल फ्रीमियम स्टोरी

मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेणारे फडणवीसच आहेत. भुजबळ आणि जरांगे या दोघांनाही फडणवीसांच्या नावाने ढोल वाजवावेत आणि सांगावं की ओबीसींचे प्रश्न…

Chhagan-Bhujbal
धनंजय मुंडेंना ओबीसींसाठीचे “काम” मंत्री भुजबळांकडून जबाबदारी

बीड येथील महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माजीमंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे…

ताज्या बातम्या