scorecardresearch

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Congress leader Vijay Vadettiwar shared a video of a singing program at the Tehsil office on social media
तहसीलदाराचा खुर्चीवर बसून गाण्यांचा रिॲलिटी शो… विजय वडेट्टीवार म्हणाले शासनाने…

एका तहसीलदाराने तहसील कार्यालयातील खुर्चीवर बसून उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांपूढे चक्क गाणी गाण्याचे कार्यक्रम केल्याचे पुढे येत आहे.

Nandurbar tribal leader Padmakar Valvi rejoins Congress after quitting BJP  Maharashtra politics
मोठी राजकीय घडामोड, भाजप सोडून काँग्रेसमध्ये परतले वळवी

इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असताना नंदुरबार जिल्ह्याचे भाजप नेते माजी मंत्री व माजी आमदार पद्माकर वाळवी यांनी शुक्रवारी…

PM Modis RSS Praise Speech Sparks Political Debate
पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक; काँग्रेसने का सोडलं टीकास्त्र

Congress criticism Modi speech भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला…

flag hoisted in the field against Shaktipeeth in kolhapur
कोल्हापूरात अनोखे आंदोलन; शक्तीपीठ विरोधात शेतात तिरंगा झेंडा फडकला

तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात, या घोषवाक्यखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: “पाकिस्तानप्रेमी राहुल गांधी…”, भाजपाची टीका; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला संसदेचे दोन्ही विरोधी पक्षनेते अनुपस्थित

Rahul Gandhi Red Fort: वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर राहुल गांधी आणि खरगे यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.…

ED raids Karnataka Congress MLA
सरकारी तिजोरीत ३८ कोटींचा घोटाळा, काँग्रेस आमदाराच्या घरावर ईडीचे छापे; काय आहे नेमकं प्रकरण?

Illegal iron ore export India सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले.

vote chori loksatta,
“मतचोरीच्या लढाईत काँग्रेसने बरोबर यावे”, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

विधानसभा निवडणुकीनंतर ‘वंचित’ने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून या लढाईला साथ देण्याची मागणी केली होती.

Congress protests against 'vote rigging' in Shrirampur
श्रीरामपूरमध्ये ‘मतचोरी’च्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूरमध्ये आज, गुरुवारी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ तसेच मतचोरीच्या विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी (छायाचित्र पीटीआय)
राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्याकडूनच मतचोरी? भाजपाने नेमके कोणते आरोप केले?

BJP Vote Theft Allegations Against India Alliance : खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेकांवर भाजपाने मतचोरीचे आरोप…

Two senior leaders quit Congress in Jalgaon district Congress crisis deepening party crisis
जळगावात काँग्रेसला पुन्हा धक्का… प्रतिभा शिंदे यांच्यानंतर ‘या’ पदाधिकार्‍याचा राजीनामा

गेल्या ४५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी तो आणखी मोठा दुसरा धक्का मानला जात आहे.

congress committee news in marathi
लोकजागर : गणंगांचा गोतावळा!

या अशा सग्यासोयऱ्यांच्या भरवशावर काँग्रेस भाजपशी सामना करायला निघाली आहे. याच्याइतका हास्यास्पद प्रकार दुसरा असूच शकत नाही. आक्षेप या नेत्यांच्या…

Jalgaon congress loksatta news
“मी काँग्रेसमधून बाहेर पडण्यास हे सर्व कारणीभूत…”, प्रतिभा शिंदेंनी थेट नावे घेतली

जळगावमध्ये एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिभा शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याची कारणीमिमांसा करताना काँग्रेसमधील राज्याच्या धुरिणांवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या