Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

काँग्रेस Videos

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Vinesh Phogat and Bajrang Punia join Congress party
कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात; विनेश फोगट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेस पक्षात प्रवेश|congress

कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात; विनेश फोगट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेस पक्षात प्रवेश|congress

Chhtrapati Shivaji Maharaj Surat Controversy what did Narendra modi and Devendra Fadnavis said in speech
Chhatrapati Shivaji Maharaj Controversy: छ. शिवरायांनी सुरत लुटली नाही, मोदींचं भाषण चर्चेत

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा…

Sanjay Raut made a suggestive statement about the Chief Ministership of the Mahavikas Aghadi
Sanjay Raut on CM Position: “काँग्रेसमध्ये जर वेगळा चेहरा…”; संजय राऊत नाना पटोलेंना काय बोलले?

आगामी विधानसभेसाठी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत सध्या खलबतं सुरु आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे…

Prakash Ambedkar gave a reaction on current political issue in Bangladesh
Prakash Ambedkar:”भाजपा आणि काँग्रेसचे सरकार असताना फॉरेन पॉलिसी नेहमीच अपयशी ठरली”: प्रकाश आंबेडकर

बांगलादेशात सध्या सुरु असलेल्या राजकीय ताणावावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आला…

Praniti Shinde raised the issue in Lok Sabha over Maratha reservation
Praniti Shinde: “महाराष्ट्रात मराठा, धनगरांना आरक्षण द्या”; प्रणिती शिंदेंनी लोकसभेत मांडला मुद्दा

आज लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. यावेळी त्या म्हणाल्या,”आरक्षणाच्या मु्द्यावरुन महाराष्ट्रात तणाव…

Nana Patole has commented on why the future chief minister wrote on Veena he had in pandhrpur
Nana Patole: नाना पटोले मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ? पंढरपूरमध्ये काय घडलं?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी (१५ जुलै) विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात चक्क ‘भावी मुख्यमंत्री’ असा…

Shivsena UBT Leader Sanjay Rauts allegation on Mahayuti
Sanjay Raut on MLC Election: लाच देऊन क्राॅस व्होटिंग; संजय राऊतांचा महायुतीवर आरोप

विधान परिषद निवडणुकीत क्राॅस व्होटिंग झालं हे काँग्रेसने मान्य केलं आहे. आमच्या कोट्यातील मतांसंदर्भात आम्हालाही तो अनुभव आला आहे, असं…

Bacchu Kadus reaction to Congress MLAs rebellion
Bacchu Kadu on Congress: काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सगळे नऊ उमेदवार विजयी झाले. तर शेकापचे जयंत पाटील यांना केवळ १२ मतं मिळली.…

ताज्या बातम्या