Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Prataprao Bhosale grandson Yash Raj Bhosale met Sharad Pawar satara news
प्रतापराव भोसलेंचे नातू शरद पवारांच्या भेटीला; वाईतून उमेदवारीची मागणी

काँग्रेसचे माजी प्रांताध्यक्ष कै. प्रतापराव भोसले यांचे नातू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज…

Ilhan Umar meet rahul gandhi
Rahul Gandhi Meet Ilhan Omar : भारताविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान ओमरची राहुल गांधींनी घेतली भेट, भाजपा आक्रमक!

Rahul Gandhi Meet Ilhan Umar : इल्हान ओमर या कायम भारताविरोधीत भूमिका मांडतात. राहुल गांधी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यात…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “आमच्या आणखी २० जागा निवडून आल्या असत्या तर…”, खर्गेंचं मोठं वक्तव्य; काश्मीरमधून भाजपावर हल्लाबोल

Mallikarjun Kharge Targets BJP : मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, लोकसभेला आमच्या २० जागा कमी पडल्या.

AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ? प्रीमियम स्टोरी

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने फारुख…

amit shah rahul gandhi
Amit Shah Targets Rahul Gandhi: “मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत…”, अमित शाह यांची लोकसभा विरोधी पक्षनेत्यांवर टीका; म्हणाले, “देशविरोधी…”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील विधानांवरून त्यांच्यावर टीका केली आहे.

caste census latest news in marathi
जातीनिहाय जनगणनेचे भय कशाला?

जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर गेली कित्येक वर्षे सामाजिक वातावरण गढूळ केले जात आहे, पण केवळ या गणनेमुळे प्रत्यक्षात कोणाला काही लाभ…

Haryana Assembly Election
Haryana Assembly Election : इंडिया आघाडीत फूट? काँग्रेस -‘आप’चं फिस्कटलं; हरियाणात ‘आप’कडून २० उमेदवार जाहीर, कोणाला फटका बसणार?

‘आप’ने सोमवारी (९ सप्टेंबर) हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवार जाहीर केले. एवढंच नाही तर हरियाणामध्ये ५० जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचंही…

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला… प्रीमियम स्टोरी

LokPoll Survey: सर्व्हेच्या निष्कर्षांमध्ये राज्यातील एकूण २८८ जागांच्या आकडेवारीसह विभागनिहाय अंदाजही वर्तवण्यात आले आहेत.

Congress city president MLA Vikas Thackeray
“आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी”, काय म्हणाले काँग्रेस आमदार…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेतच्या चारचाकीने नागपुरात रविवारी मध्यरात्री दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली.

Why AAP and Congress failed to strike Haryana poll deal
Haryana Assembly Election: हरियाणामध्ये काँग्रेस-आप आघाडीचं घोडं कुठं अडलं? इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरती?

Why Congress and AAP could not form an alliance: हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान…

Congress question about what was the location of Sanket Bawankule between 12.30 to 1 am
नागपूर ‘हिट अँड रन’ : रात्री १२.३० ते १ या वेळेत संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? काँग्रेसचा सवाल

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना घडक दिली. पण संकेतवर अद्याप…

controversy started in mahavikas aghadi over Gopaldas Agarwal s entry in Congress
गोंदिया : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशापूर्वीच…

गोपालदास अग्रवाल गोंदियातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपा सोडून काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते

ताज्या बातम्या