Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

काँग्रेस Photos

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
INDIA Bloc meeting
7 Photos
PHOTOS : इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील रणनीती काय ठरली; कोणी लावली उपस्थिती? पहा फोटो

भाजपाचे सरकार जनतेला नको आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पाऊले उचलू, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी…

10 Photos
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन; गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास! म्हणाले, “पूर्वी काश्मीरमध्ये…”

पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या, त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत, असे शहा म्हणाले.

solapar fight who win
13 Photos
सोलापूरमध्ये मतदानानंतर दोन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा; वाचा काय आहे स्थिती

सोलापूर लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ नंतर मोदी लाटेत येथील राजकीय परिस्थिती बदलली.

eknath shinde on vijay wadettiwar
10 Photos
विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून समाचार; म्हणाले “काँग्रेसचा हात पाकिस्तान..”

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (सर्व फोटो एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार या…

prithviraj chavhan on bjp Narendra modi
9 Photos
“भाजपाला सत्ताच मिळणार नाही” पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; तर प्रकाश आंबेडकर यांच्यावरही जोरदार टीका

पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. यामध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. (सर्व…

what is congress grass
9 Photos
‘काँग्रेस गवत’ म्हणजे नेमके काय? या गवताला ‘काँग्रेस’ का म्हणतात?

तुम्हाला माहिती आहे का काँग्रेस गवत म्हणजे नेमकं काय? या गवताला काँग्रेस हे नाव कसे पडले? आज आपण याविषयी सविस्तर…

rahul gandhi on pm modi
9 Photos
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान; म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर भाष्य करताना दिसत नाहीत.” असेही राहूल गांधी म्हणाले.

congress on pm modi
9 Photos
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘त्या’ विधानावरुन काँग्रेसचे प्रत्त्युत्तर, निवडणूक आयोगात तक्रार; भाजपावर चौफेर हल्ला

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर..

pm modi on sonia gandhi
8 Photos
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर खोचक टीका; म्हणाले, “मैदानातून पळून..”

काल, २१ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये आयोजीत प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे.

ताज्या बातम्या