scorecardresearch

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया News

१९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. त्या सुमारास क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती असे मानले जाते. विश्वचषक स्पर्धेमुळे क्रिकेटच्या लोकप्रियता वाढत गेली. तो काळ वेस्ट इंडिजच्या संघाने गाजवला. कालांतराने क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाने अनोखा विक्रम केला आहे. या संघाने सलग ५ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांनी टी-२० विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचा पराभव केला होता. फार आधीपासून ऑस्ट्रेलिया हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. ऑस्ट्रेलियालाही भारत नेहमी आव्हान देत असतो.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यामध्ये वैर नसले तरी ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये नेहमी दुसऱ्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या २०२३ विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हे दोन्ही संघ १३ वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाला ८ वेळा यश मिळाले आहे. तर भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटच्या १४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५६ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चढाओढ खऱ्या अर्थाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या गाबा कसोटीमध्ये पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर ३२ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच २९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.


Read More
abhishek sharma
Abhishek Sharma: गुरू तसा शिष्य! अभिषेक शर्माने मोडला सर्वाधिक षटकारांचा विक्रम; वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला टाकलं मागे

Abhishek Sharma Record: भारताच सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

India vs Australia T20 live match updates in marathi
भारताला आघाडीची संधी, चौथा ट्वेन्टी-२० सामना आज; उर्वरित मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया हेड, हेझलवूडविना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ट्वेन्टी-२० सामना आज, गुरुवारी करारा येथे खेळवला जाणार असून, या वेळी पाहुण्यांना पाच सामन्यांच्या या…

IND beat AUS by 5 wickets in 3rd T20I Washington Sundar Jitesh Sharm Arshdeep Singh 3 Wickets
IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘सुंदर’ विजय, वॉशिंग्टन-जितेशची अखेरच्या षटकांमध्ये वादळी फलंदाजी; अर्शदीपची निर्णायक गोलंदाजी

IND vs AUS 3rd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना अटीतटीचा झाला.

India vs australia
India vs Australia : फलंदाज कामगिरी उंचावणार? भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

Arshdeep Singh : पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाबाहेर बसविण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

suryakumar yadav
IND vs AUS: ‘आता तरी देवा मला पावशील का..’, टॉस गमावल्यानंतर सूर्याची मजेशीर रिॲक्शन व्हायरल, पाहा Video

Suryakumar Yadav Viral Video: नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

India vs australia
India vs Australia 2nd T20: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर एकतर्फी विजय! मालिकेत १-० ने घेतली आघाडी

India vs Australia 2nd T20 Full Scorecard: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये…

Jemimah Rodrigues
Jemimah Rodrigues: सचिनला पाहून ११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं ‘ते’ स्वप्न, आता वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण

Jemimah Rodrigues On Sachin Tendulkar: भारतीय संघाच्या विजयाची हिरो ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने सचिन तेंडुलकरला पाहून कशी प्रेरित झाली, याबाबतचा किस्सा…

Jemimah Rodrigues
INDW vs AUSW: सामना सुरू होण्याच्या ५ मिनिटांपूर्वी घेतलेला ‘तो’ निर्णय भारतासाठी ठरला टर्निंग पॉईंट; नेमकं काय घडलं?

Jemimah Rodrigues On Number 3 Batting Position: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. याबाबत बोलताना…

India vs Australia 2nd T20I
India Vs Australia T20I : पुन्हा पावसाचा व्यत्यय?,भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज

शुक्रवारी होणाऱ्या सामन्याच्या वेळीही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु हा अंदाज फोल ठरेल अशी दोन्ही संघांच्या चाहत्यांना आशा…

ताज्या बातम्या