क्रांतीकाऱी शेतकरी पक्ष हा महाराष्ट्रातील पक्ष असून माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी २०१७ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर ते २०१९ साली विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०२० साली गडाख यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्ष विसर्जित करून शिवसेनेत प्रवेश केला होता.