scorecardresearch

महाविकास आघाडी News

महाविकास आघाडीची स्थापना २०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

२०१९मध्ये विधानभा निवडणुका झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्षे टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read More
Mahavikas Aghadi warns of going to court against Prabhag rachana
Mahavikas Aghadi: प्रभागरचनेविरोधात न्यायालयात जाण्याचा महाविकास आघाडीचा इशारा

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रभागांच्या सीमा चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आल्या असून त्यावर…

CIDCO administration responded to mahavikas aghadis fraud claims over 54000 sq m land allocation letter to bivalkar family
सिडकोच्या भूखंडवाटपावरून खडाजंगी, महाविकास आघाडीचा आरोप, तर सिडकोकडून ठाम भूमिका

बिवलकर कुटुंबीयांसाठी साडेबारा टक्के योजनेच्या माध्यमातून ५४ हजार चौरस मीटरच्या भूखंडवाटपाचे इरादापत्र तयार करणाऱ्या सिडको प्रशासनावर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या महाविकास…

Rohit Pawar to protest for rs 5000 crore land scam at CIDCO Belapur with MVA allies Wednesday
पाच हजार कोटींचा जमीन घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीचा बुधवारी सिडकोवर मोर्चा

पाच हजार कोटींचा जमीन घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह बुधवारी सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडको कार्यालयावर धडक मोर्चा…

bawankule explains bjp vote gain due to schemes for women
आम्ही अडीच कोटी लाडक्या बहिणींकडे गेलो; त्यामुळे ६९ लाख मतांनी…. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले गणित…

“अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजना दिल्यामुळे आमच्या मतांमध्ये ६९ लाखांची वाढ झाली, काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल होत आहे, असा आरोप महसूल…

Case registered against MNS worker for throwing black paint on the board of Navi Mumbai Airport
नवी मुंबई विमानतळाच्या फलकावर काळे फासल्याने गुन्हा दाखल

सरकारी मालमत्तेचे नूकसान केल्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याकडे बुधवारी पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४…

Nawab Malik takes charge of NCP Mumbai elections
राष्ट्रवादी मुंबई निवडणुकीची सूत्रे नवाब मलिक यांच्या हाती

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची ‘मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी मलिक यांना नेमण्यात…

Mahavikas Aghadi march at Panvel Municipal Corporation headquarters
अन्यथा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखू; पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा इशारा

बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले.

mim dhule office bearers resign en masse
एमआयएम पक्षात भूकंप… प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

स्थानिक समस्यांकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Ichalkaranjit mva Kavad Yatra for Sulkud Water Scheme
सुळकुड पाणी योजनेसाठी इचलकरंजीत मविआची कावड यात्रा

इचलकरंजी शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुळकुड योजना मंजुर केली आहे. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी विलंब होत…

ताज्या बातम्या