scorecardresearch

म्हाडा News

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
E-auction of 149 shops in Mumbai registration from August 12
मुंबईतील १४९ दुकानांचा ई लिलाव १२ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती

या ई लिलावात मुंबई मंडळाच्या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार दुकानांसाठी विजेता ठरणार असून त्या पात्र विजेत्यास दुकानाचे वितरण केले…

MHADA promises repairs, but no action
पत्राचाळ प्रकल्पातील ९० टक्के सदनिकांमध्ये दोष? म्हाडाकडून दुरुस्तीचे आश्वासन, मात्र कार्यवाही नाही

रहिवाशांनी नेमलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने ९० टक्के सदनिकांमध्ये दोष असल्याचा अहवाल दिला असून त्याकडे म्हाडा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी…

BG Shirke wins bid for PMGP Colony redevelopment in Jogeshwari
पीजीपी वसाहतींचा पुनर्विकास शिर्के समुहाकडे; आर्थिक निविदेत शिर्के समुहाची बाजी

जोगेश्वरीमधील पूनम नगर मेघवाडी येथील पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील (पीएमजीपी) वसाहतीच्या पुनर्विकासासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच म्हाडाकडून खुल्या करण्यात आल्या आहे.

mhada police case
मुंबई : पुनर्विकसित इमारतीतील १८ घरे लाटली! म्हाडाकडून गुन्हा दाखल

दक्षिण मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत पुनर्रचित इमारती तर खासगी विकासकांमार्फत पुनर्विकसित इमारती उभारुन केल्या जातात.

Will follow up to continue local, metro trains throughout the night for Ganesh devotees said Mangalprabhat Lodha
गणेशभक्तांसाठी रात्रभर लोकल, मेट्रो सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावा करणार – मंगलप्रभात लोढा

भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार सुरू असल्याची माहिती लोढा…

Worli BDD redevelopment... The wait of 556 residents will end within a week
वरळी बीडीडी पुनर्विकास… ५५६ रहिवाशांची प्रतीक्षा आठवड्याभरात संपणार; १८० चौरस फुटांच्या घरातून थेट…

म्हाडाकडून घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात ताबा देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

Mill workers allegations Chadha developers
बनावट आधारकार्ड, बँक खात्याचा आधार घेऊन कामगारांच्या नावे अर्ज ? म्हाडाच्या नावाने गिरणी कामगारांची फसवणूक

दीड लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा नाही. त्यामुळे सरकारने वांगणीत चढ्ढा समुहाला ५१ हजार तर शेलूत ३० हजार घरे…

mhada homes in navi Mumbai cheaper than cidco housing lottery sees drop as mhada gains interest
म्हाडाच्या घरांच्या किमती सिडकोपेक्षा कमी; घर मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ

सिडकोने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जागेची किंमत तसेच बांधकाम खर्च याचा ताळमेळ घालूनच या योजनेतील घरांच्या किमती ठरवल्या होत्या.

MHADA fails to evacuate residents from highly dangerous building
अतिधोकादायक इमारत दुर्घटना…अंदाजे अडीच हजार कुटुंबांचा जीव मुठीत; अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना…

यंदा दुरुस्ती मंडळाने केलेल्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळल्या. या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या…

affordable housing Maharashtra, 20 percent inclusive housing scheme, MHADA homes, Maharashtra housing policy, affordable homes Mumbai,
गरिबांसाठीच्या घरांवर पाणी, म्हाडाला १२ वर्षांत दोन लाखांऐवजी २० हजारच घरे

राज्य सरकारने २०१३ मध्ये सुरू केलेल्या २० टक्के सर्वसमावेश योजनेअंतर्गत म्हाडाला आतापर्यंत केवळ २० ते २५ हजारांच्या दरम्यान घरे उपलब्ध…

Distribution of three houses under the 20 percent scheme based on the fake dekar letter of the MHADA Pune board officer and the developer
म्हाडाच्या पुणे मंडळातील अधिकारी आणि विकासकाचा प्रताप बनावट देकार पत्राच्याआधारे २० टक्के योजनेतील तीन घरांचे वितरण

सोडतीत अयशस्वी ठरलेल्यांना दिली घरे, अधिकारी आणि विकासकाविरोधात गुन्हा दाखल मंगल हनवते,लोकसत्ता

ताज्या बातम्या