scorecardresearch

म्हाडा News

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
Motilal Nagar redevelopment MHADA Mumbai Board and Adani Group sign agreement Mumbai print news
मोतीलाल नगर पुनर्विकास: म्हाडाचे मुंबई मंडळ आणि अदानी समुहात करार

गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाला आता लवकरच गती मिळणार आहे. म्हाडाचे मुंबई मंडळ आणि अदानी समुहात पुनर्विकासासंबंधी सोमवारी करार…

Mumbai slum rehabilitation camp for slum transfer scheme
झोपडीचा खरेदी-विक्री व्यवहार केलेल्यांना दिलासा; झोपु प्राधिकरणाची विशेष मोहिम, महिनाभर मुंबईत शिबिर

या शिबिरात सहभागी होत कागदपत्रे जमा करुन घेत झोपडीधारका्ंना हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करुन घेता येणार आहे. झोपु प्राधिकरणाच्या कार्यालयात यासाठी…

MHADA Pune board e-auction 28 office blocks 53 shops Pune, Solapur, Sangli
पुणे, सोलापूर, सांगलीमध्ये दुकान, कार्यालयासाठी जागा घेण्याची संधी…५३ दुकानांसह २८ कार्यालयीन गाळ्यांच्या ई लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात

१७ जुलै रोजी सकाळी ११ पासून सायंकाळी ५ पर्यंत संगणकीय पद्धतीने बोली लावता येणार असून बोली संपल्यानंतर ई लिलावाचा निकाल…

hotel commercial building Patrachawl, MHADA proposal , Patrachawl latest news, MHADA latest news,
पत्राचाळीतील ३२ मजली व्यावसायिक इमारतीत १०० खोल्यांचे हाॅटेल, म्हाडा लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

म्हाडाच्या मुंबई मंडळाने पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या एका भूखंडांवर ३२ मजली व्यावसायिक इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Mhada Konkan Mandal , Mhada Konkan Mandal houses,
कोकण मंडळाच्या दोन हजार घरांसाठी लवकरच सोडत, ऑगस्टमध्ये जाहिरात, सोडतीच्या तयारीला वेग

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अखत्यारितील विक्रीवाचून रिक्त घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत सुरू आहे. आता मंडळाने दोन हजार घरांची…

Biometric survey of three thousand transit camp residents still pending
अजूनही तीन हजार संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण शिल्लक, म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून सर्वेक्षणासाठी अखेरची संधी

अनेकदा संक्रमण शिबिरार्थी घरी नसल्याने, कागदपत्रे अपुरी असल्याने वा इतर कारणांमुळे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता अशा संक्रमण शिबिरार्थींना…

malad tenants fined 2 lakh each for stalling dangerous building demolition mumbai
अतिधोकादायक ९६ इमारतींचा पाणी-वीजपुरवठा खंडीत होणार

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

MHADA to install protective nets in landslide-prone areas
म्हाडा दरडप्रवण क्षेत्रातील संरक्षित जाळ्या बसवणार, ५ कोटी रुपयांची तरतूद…१४ ठिकाणी संरक्षित भिंतींची कामे सुरू…

मुंबई शहर आणि उपनगरात एकूण २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८५ ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या…

MHADA to soon propose redevelopment of Sardar Patel Nagar in Andheri Mumbai print news | अंधेरीतील सरदार पटेल नगराचाही पुनर्विकास! म्हाडाकडून लवकरच प्रस्ताव
अंधेरीतील सरदार पटेल नगराचाही पुनर्विकास! म्हाडाकडून लवकरच प्रस्ताव

अंधेरी पश्चिम येथील सुमारे ७४ एकर भूखंडावरील सरदार वल्लभभाई पटेल नगराचा पुनर्विकासही ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’कडून (म्हाडा) केला जाणार…

Building in MHADA five star housing project receives occupancy certificate Mumbai print news
पहाडी गोरेगावमधील ३३२ विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपली; म्हाडाच्या पंचतारांकित गृहप्रकल्पातील इमारतीला अखेर निवास दाखला प्राप्त

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पहिल्यावहिल्या पंचतारांकित गृहप्रकल्पातील घरांसाठीच्या ३३२ विजेत्यांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा अखेर संपली.

Fraud case registered in a renowned organization in Solapur after 16 years
मुंबईत म्हाडाचे घर मिळवून देतो सांगून डोंबिवलीतील नागरिकाची १९ लाखाची फसवणूक

प्रभादेवी भागात म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून डोंबिवलीतील नागरिकाची तब्बल १९.६८ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस…

ताज्या बातम्या