व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मान्य केलेल्या शुल्कापेक्षा महाविद्यालयांनी शुल्क आकारल्यास आता विद्यार्थ्यांना त्याबाबत ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक महाविद्यालयांकडून पुढील शैक्षणिक वर्षासह अतिरिक्त शुल्काची मागणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी आता ८ ऑगस्टपासून सुरूवात करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जवळपास ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.