scorecardresearch

मनसे News

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Ramesh Pardeshi News
राज ठाकरेंची साथ सोडणारा ‘पिट्या भाई’ अर्थात रमेश परदेशी कोण? काय आहे भाजपा प्रवेशाचा पॅटर्न?

मनसेच्या चित्रपट समितीच्या उपाध्यक्षपदी रमेश परदेशी होते, त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला आहे.

Gajanan Kale's letter to Deputy Chief Minister Eknath Shinde and Minister Ganesh Naik
Video : जुन्या शिवसैनिकांना साद…! मनसे प्रवक्ते गजानन काळेंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईकांना पत्र

नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती महापालिकेने पुन्हा उभारलेल्या हिरव्या कापडी जाळीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Ramesh Pardeshi BJP Entry
राज ठाकरेंची साथ सोडत मुळशी पॅटर्नमधला ‘पिट्या भाई’ भाजपात; “माझ्यावर संघाचे संस्कार असल्याने…”

राज ठाकरेंनी रमेश परदेशी या कलाकाराला काही दिवसांपूर्वी झापलं असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान आता रमेश परदेशी यांनी मनसेतून भाजपात…

mns faces split as 14 ambernath candidates file nomination on Shiv Sena Thackeray symbol
मनसे अंबरनाथमध्ये मशालीवर, बदलापुरात अपक्ष; कुठे संभ्रम रोखण्यासाठी, तर कुठे निर्णयाअभावी गोंधळ

MNS : नगरपालिका निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी अंबरनाथ शहरात मनसेला मोठे खिंडार पडले.

bhaymukt sangli protest demands strict police action citizens mns safety
भयमुक्त सांगली साठी ठिय्या आंदोलन…

गेल्या दहा महिन्यांत साठहून अधिक खून आणि वाढत्या हिंसाचारामुळे सामान्य नागरिक भयभीत असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशा मागणीसाठी सांगलीत…

Shiv Sena Thackeray faction and MNS start presenting seat sharing calculations
शिवसेना-मनसेत जागावाटपाचा कळीचा मुद्दा फ्रीमियम स्टोरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी दोन्ही बंधू यांची पुन्हा एकदा भेट झाली. मागील तीन महिन्यांत या भेटीगाठी वाढ झाली असून…

Navi Mumbai NMMC sealed Chhatrapati Shivaji Maharaj statue
महाराजांचा पुतळा पुन्हा बंदिस्त; ‘गनिमिकाव्याने स्मारक खुले करू’ – मनसेचा इशारा

नेरूळ सेक्टर–१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याभोवती नवी मुंबई महापालिकेने रविवारी मध्यरात्री लोखंडी जाळी उभी करून संपूर्ण परिसर बंदिस्त…

Devendra Fadnavis Eknath Shinde ajit pawar (1)
Maharashtra News Highlights: “महायुतीतील नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश नाही, तिन्ही पक्षांचा निर्णय”, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Maharashtra News Highlights: महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

What Sharmila Thackeray Said About Uddhav Thackeray?
“एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेता आणि…”; उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत सुरु असलेल्या केसवर भाष्य केलं आहे.

Sharmila Thackeray News
“१८०० कोटींचा व्यवहार झाला पण गुन्हा दाखल झाला नाही, पण..”; अमित ठाकरे गुन्हा प्रकरणी शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?

राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर आता शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया…

MNS Raj Thackeray Loyalty Rejects shivsena ubt Ticket Shivbandhan Rejected Sangita Chendwankar Independent Badlapur Election
राजसाहेबांसाठी ‘त्या’ रणरागिणीने नाकारली ठाकरेंची उमेदवारी; शिवबंधन अमान्य, मनसेच्या संगिता चेंदवणकर अपक्ष म्हणून…

Sangita Chendwankar : बदलापुरातील मनसेच्या रणरागिणी संगीता चेंदवणकर यांनी राज ठाकरेंवरील निष्ठेमुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची ‘शिवबंधन’ अट अमान्य…

Thane RMC Cement Project Bombay HighCourt MPCB Pratap Sarnaik Justice Violated Raj Transit Infra mumbai
मराठी अमराठी वाद : मनसेविरुद्धच्या याचिकेतून उत्तर भारतीय शब्द वगळा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेतून ‘उत्तर भारतीय’ आणि ‘अमराठी…

ताज्या बातम्या