scorecardresearch

मनसे Photos

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Raj and Uddhav Thackeray
11 Photos
राज आणि उद्धव ठाकरेंच्या चार महिन्यांत नऊ भेटीगाठी, आता युतीची फक्त औपचारिक घोषणा बाकी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चार महिन्यांतली नववी भेट. ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा बाकी.

MNS Deepotsav 2025 Raj Uddhav Thackeray
12 Photos
Photos: दीपोत्सव मनसेचा, पण चर्चा ठाकरेंच्या सुनांची; रश्मी व शर्मिला ठाकरेंचा दिवाळी लूक पाहिलात का?

मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

uddhav thackeray first visit raj thackray shivtirth for ganpati darshan ganesh chaturthi 2025
9 Photos
‘शिवतीर्थ’वर ‘असा’ रंगला ठाकरे बंधूंच्या तिसऱ्या भेटीचा सोहळा; गणपतीनिमित्त राज-उद्धव सहकुटुंब एकत्र, फोटो पाहिलेत का?

Ganesh Chaturthi 2025: गणेशात्सवाची धूम सुरू झाली असताना, राज्यातही एक मोठी घडामोड घडली आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव…

Uddhav Thackeray to Inaugurate MNS Deepotsav at Shivaji Park Raj  Thackeray brothers unity
9 Photos
Raj Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार? राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

mira bhayandar mns morcha photos (3)
12 Photos
Photos : मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांचा एल्गार; मोर्चामध्ये मनसेसह ठाकरे गटाचे नेतेही सहभागी

Maharashtra Navnirman Sena Protest Rally: त्यानंतर आज (८ जुलै) मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, मनसेच्या…

MNS Mira Road Protest Pratap Sarnaik
10 Photos
MNS Mira Road Protest: ‘पोलिसांची दादागिरी चालणार नाही..’; मीरा भाईंदरच्या मराठी भाषिक आंदोलनात प्रताप सरनाईक

घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदी भाषिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचे दिसून आले.

Uddhav-Raj Thackeray Victory Rally
8 Photos
Uddhav-Raj Thackeray Rally: ‘सन्माननीय राज’ आणि ‘सन्माननीय उद्धव…’, ठाकरे बंधूंनी एकमेकांचा उल्लेख करत केली भाषणाला सुरुवात

Uddhav-Raj Thackeray Rally: ‘सन्माननीय राज अन् सन्माननीय उद्धव…’, ठाकरे बंधूंनी भाषणात एकमेकांच्या नावाचा उल्लेख कसा केला? वाचा !

Who Said What On Raj Thackeray And Uddhav Thackeray Sabha
9 Photos
“मराठीबद्दल एक शब्दही न बोलता…”, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर कोण काय म्हणाले?

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचे दोन जीआर रद्द केल्यानंतर…

Old Comments Thackery vs Thackeray
12 Photos
‘मनसे संपलेला पक्ष’ ते ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनोमिलन झालं पण जुन्या जखमांचं काय?

Old Comments Thackery vs Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पक्षीय पातळीवर एकत्र येण्याचे संकेत दिले असले तरी मागच्या…

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Sabha Family Photos
10 Photos
Photos: फक्त दोन भाऊच नाही, आख्खं ठाकरे कुटुंब आलं एकत्र! विजयी मेळाव्यानंतर झालं खास फोटोसेशन!

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Sabha Family Photos: आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी…

Dombivli district Thackeray group Dipesh Mahatre statement on MNS and Shiv Sena alliance
12 Photos
Uddhav-Raj Thackeray Victory Rally: ‘हिंदुत्व सोडलेलं नाही’, एकत्र आलोय एकत्र राहणार… काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कुणाच्याही लग्नात भाजपावाल्यांना बोलावू नका. येतील जेवण करतील आणि नवरा-बायकोत भांडण लावून जातील. नाहीतर नवरीला पळवून नेतील. भाजपाचे हेच उद्योग…

ताज्या बातम्या