scorecardresearch

मनसे Videos

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Dombivali MNS Raju Patil Raises Concern Over Stuck Ambulance Near Station Road
डोंबिवलीत फेरीवाल्यांनी अडवली रुग्णवाहिका? मनसेचे राजू पाटील भडकले, थेट शिंदेंवर हल्लाबोल..

Dombivali MNS Raju Patil Raises Concern Over Stuck Ambulance Near Station Road: डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणामुळे एक रुग्णवाहिका स्थानक…

Kasturba Hospital Controversy
प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फेकल्याने वाद चिघळणार? कस्तुरबा रुग्णालय प्रकरणी मनसेची रोखठोक भूमिका

Kasturba Hospital Controversy: मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा…

MNS protests over Pune Sinhagad Road flyover not being inaugurated
MNS Pune।सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पुण्यात सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे, पुलाचं उद्धाटन न झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं मनसेचा आरोप…

MNS protests against the government in Chandivali Mumbai
Chandivali MNS Protest: मुंबईतील चांदिवलीत खड्डे; सरकारविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन

Chandivali MNS Protest: मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील चांदिवली येथे एक आंदोलन केले. चांदिवली भागात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्यामुळे…

Sanjay Raut gave a reaction on Best Election
Sanjay Raut on Best Election: पतपेढी निवडणूक निकालाबाबत माहिती नाही, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे मनपा निवडणुआधी ठाकरे बंधूंसाठी हा धक्का…

MNS workers chaos at the Commissioners office in Pune what exactly happened
MNS Protest in Pune:पुण्यात आयुक्त कार्यालयात गोंधळ, मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं घडलं काय?

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची घटना घडली. त्या…

Marathi-Hindi dispute breaks out in Navi Mumbai Municipal Corporation
Marathi-Hindi Controversy: नवी मुंबई मनपात मराठी-हिंदी वादाची ठिणगी, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्रात भाषिक वादाचा मुद्दा तापला आहे. त्यातही मुंबईतून मराठी-हिंदी वादाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. नवी मुंबईतून असाच एक व्हिडीओ…

ताज्या बातम्या