scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष News

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
Manikrao Kokate
“…तर नागपूर अधिवेशनात मंत्रिपदाचा राजीनामा देईन”, विधीमंडळातील रमीच्या डावावर माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण

Manikrao Kokate Statement on Rummy Video : विधीमंडळाच्या सभागृहातील कथित ऑनलाइन रमीच्या डावावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की “मी…

NCP state president Sunil Tatkare also had to face the wrath of the camp in Dharashiv city
छावाच्या कार्यकर्त्यांनी फाडले राष्ट्रवादीचे बॅनर; धाराशिवमध्येही तटकरेंना रोषाला सामोरे जावे लागले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धाराशिव शहरातही छावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Attempt to set fire to NCP office in Jalna
जालन्यात राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न; पेट्रोलची पेटती बाटली फेकली

भुतेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपण मुक्कामास असताना रविवारी रात्री अकराच्या सुमारास बाहेर मोठ्याने बोलण्याचा आणि…

ajit pawar on latur incident
Ajit Pawar Post: लातूरमधील मारहाण प्रकारावर अजित पवार भडकले; थेट राजीनाम्याचे दिले आदेश, नेमकं घडलं काय?

Ajit Pawar Post: लातूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यावर अजित पवारांनी मोठं पाऊल उचललं आहे.

ajit pawar chhava sanghatana news
अजित पवार गटावर शेतकरी विरोधी ठपका प्रीमियम स्टोरी

लातूर येथे ‘छावा’च्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादीने मारहाण केल्यानंतर कृषी मंत्री आणि अजित पवार यांचा गट शेतकरी विरोधी असल्याचा सूर उंचावला जाऊ…

Suraj Chavan on Latur Assault case
रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी मारहाण अन् दिलगिरी, सूरज चव्हाणांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Suraj Chavan on Latur Assault case : सूरज चव्हाण म्हणाले, “शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या छावा संघटनेच्या प्रतिनिधींना व प्रदेशाध्यक्ष विजय…

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra Breaking News Live Updates: कोकाटेंचा राजीनामा कधी? सूरज चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाचा सवाल

Maharashtra Politics Live News Updates: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच दोन दिवसांत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा…

Vijay Ghadge Patil
“…म्हणून राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला”, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितली आपबिती

Vijay Ghadge Patil On NCP : विजयकुमार घाडगे म्हणाले, “कोकाटे यांना सभागृहात शेतकऱ्यांसाठी बोलण्याऐवजी पत्ते खेळण्यात रस असेल तर त्यांना…

Sunil Tatkare
Chhava Sanghatana: “जी चूक घडली…”, राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

Chhava Sanghatana-NCP: आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी…

sunil tatkare faces chaos in latur after chhava workers protest over Manikrao Kokate card game controversy
कृषीमंत्री कोकाटेंच्या पत्त्याच्या डावावरुन लातूरमध्ये तटकरेंसमोर गोंधळ

‘आम्ही मंत्र्यांना आमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवतो. ते जर पत्ते खेळत असतील तर त्यांना घरी बसवून पत्ते खेळायला हे पत्ते द्या,…

dhananjay munde dominates beed ncp rally prakash solanke absent ncp ajit pawar group Maharashtra politics
बीडमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यावर धनंजय मुंडेंचा वरचष्मा

आमदार सोळंके हे काही वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण मेळाव्यातच देण्यात आले असले तरी त्याची राजकीय वर्तुळात…

ताज्या बातम्या