scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष News

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
NCP state president Sunil Tatkare news in marathi
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सुनील तटकरेंचे महत्वाचे वक्तव्य….

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेले असतांना खासदार तटकरे यांनी पहिल्यांदाच पालकमंत्री पदाबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केले…

nashik district bank crisis political war between chhagan Bhujbal manik kokate
अजित पवार गटाचे छगन भुजबळ-माणिक कोकाटे यांच्यात वाकयुद्ध; राजकीय नेत्यांनी नाशिक जिल्हा बँक बुडविल्याचा आरोप

हजारो कोटींच्या थकीत कर्जामुळे अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा बँकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) छगन भुजबळ आणि माणिक कोकाटे या दोन…

NCP Jayant Patil resignation AJit Pawar Reaction
Ajit Pawar on Jayant Patil: जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना कदाचित…”

Ajit Pawar on Jayant Patil Resignation: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे…

Sanjay Jagtap Congress district president of Purandar assembly constituency has resigned
संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

जगताप यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असून, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडे राजीनामा पत्र…

Jayant Patil And Devendra Fadnavis
Jayant Patil: “ज्यांनी राजीनामा दिला, त्यांना…”, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Jayant Patil Resignation: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही माध्यमांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला…

parth pawar pimpri chinchwad election politics ncp
पिंपरी-चिंचवडमध्ये पार्थ पवार पुन्हा सक्रिय? प्रीमियम स्टोरी

पार्थ पवार यांनी नुकतीच महापालिका मुख्यालयात येत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्न, माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे…

dadasaheb Phalke film city to come up at igatpuri near nashik cultural development
मुंढेगाव चित्रनगरीविषयी अधिवेशनानंतर बैठक; आशिष शेलार यांचे अजित पवार गटाला आश्वासन

अजित पवार गटाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आदित्य संजयराव यांनी मंत्री शेलार यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सांस्कृतिक क्षेत्राशी…

Both the key posts of Kolhapur Agricultural Produce Market Committee have been handed over to Ajit Pawars NCP
कोल्हापूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सभापतीपदी सूर्यकांत पाटील, राजाराम चव्हाण उपसभापती

सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत रघुनाथ पाटील (बाचणी) यांची तर उपसभापतीपदी राजाराम तुकाराम चव्हाण (येळवण जुगाई) यांची…

jitendra awhad supports thackeray brothers unity supportive statement on vijayi rally Maharashtra politics
या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून रिंगणात उतरु, जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतानाचा एक व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून…

eknath shinde jai gujarat slogan sunil tatkare reaction
गुजरातविषयक एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य माहीत नाही…राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा…

ताज्या बातम्या