scorecardresearch

पुणे मेट्रो

मुंबईप्रमाणे पुणे शहरामध्येही वेगाने प्रगती होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये असंख्य उद्योगधंदे सुरु झाले आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आयटी पार्क्स पाहायला मिळत आहेत. करीअरची संधी मिळत असल्याने लोक पुण्यात स्थलांतरीत होत आहेत. फार पूर्वीपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसह पुण्यामध्ये नोकरदार वर्गाचेही प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम पुण्यातील वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दशकांमध्ये ही समस्या अधिक भीषण झाली आहे. यावर उपाय म्हणून २००६ मध्ये बीआरटीची सुरुवात करण्यात आली. पण त्याला अपयश आले. याच सुमारास मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावरुन पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर सादर करण्यात आला. २०१२ मध्ये याला राज्य सरकारची संमती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महामेट्रोचे भूमिपूजन केले गेले. सध्या या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहेत. मार्च २०२२ मध्ये ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली. महामेट्रो प्रकल्पामध्ये आणखी ३ मार्गिका जोडण्यात येणार आहेत.Read More
PMP office and Maharashtra Metro Rail Corporations Mahametro Integrated Transport Hub Center to be set up
पुण्याच्या पीएमपीच्या मुख्यालयाच्या जागेत महामेट्रोचेही ‘हब सेंटर’

पीएमपीचे कार्यालय आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनचे (महामेट्रो) एकत्रित वाहतूक केंद्र (हब सेंटर) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी…

puneri patya in pune metro
Puneri Patya Photos : “पुण्यात सगळेच दर्दी आहेत..” मेट्रोत पुणेरी पाट्या, प्रवासी बघतच राहिले..

Puneri Patya In Pune Metro : सध्या पुणे मेट्रोने या पाट्यांचा वापर करून सुचना फलक लावलेले आहे आणि पुणेरी बाणा…

pune Swargate Katraj Metro work to start in three months State government additional cost two stations
स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू? दोन स्थानकांमुळे वाढलेला ६८३ कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार देणार

राज्य सरकारकडून संबंधित दोन्ही स्थानकांना मंजुरी देऊन वाढीव खर्चासाठी निधी देण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित…

Joshi Railway Museum
‘जोशी रेल्वे संग्रहालया’मध्ये पुणे मेट्रोच्या प्रतिकृतीची निर्मिती

भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते आहे. त्यामुळे तरुण पिढीला येथील चालते-फिरते रेल्वेचे प्रकार समजण्यास आणखी सोपे झाले आहे.

संबंधित बातम्या