scorecardresearch

पाऊस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Gondia farmers affected by Unseasonal rains on the verge of harvest
गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाचे थैमान, उभे आणि कापणी केलेले धानाचे पीक भिजले

काही ठिकाणी चुरणीचे कामही सुरू आहे. अनेक ठिकाणी कापणीनंतर भात शेतात सुकविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर मोठे शेतकरी कापणी यंत्राद्वारे…

It will rain until the end of October
ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाच्या सरी कोसळणारच ; यंदा पावसाचे सहाव्या महिन्यात आगमन, पूर्वमोसमी, मोसमी आणि उत्तर मोसमी पावसाचा फटका

यंदाचे निम्मे वर्ष पावसात गेले आहे. आणखी काही काळ याच पावसाचा सामना करावा लागणार आहे.

Maharashtra Govt Compensation Pending Farmers No Diwali Nandar Village Paithan sambhajinagar
दिवाळीत ‘नांदर’मध्ये सूतकी सावट; अतिवृष्टीग्रस्त गावे अनुदानापासून वंचित…

पैठण तालुक्यातील नांदर महसूल मंडळात दोन अतिवृष्टी आणि दिवाळीतील पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने सूतकी सावटात दिवाळी…

marathwada cotton yield falls amid excessive rainfall
धक्कादायक! मराठवाड्यात कापसाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांची मोठी तूट…

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांची तूट आली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

imd predicts rain thunder mmr region thane palghar Mumbai
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज…

मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

pune chances of rainfall during Diwali
Pune Rain News: ऐन दिवाळीत धुंवाधार… पुढील काही दिवस पावसाचेच?

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात निर्माण झालेला चांगला विकसित कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची, तसेच पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

Flights from Nashik are expensive; Passengers are upset due to increased prices by airlines
नाशिकहून विमान प्रवासासाठी निघताहेत ?…वाढीव तिकीट दर बघा, मग बॅग भरा…

दिवाळीच्या सुट्याच्या पार्श्वभूमीवर, पर्यटक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागल्याचा विमान कंपन्यांनी फायदा उचलला आहे. त्यांनी तिकीट दरात जुलैच्या तुलनेत तिप्पट…

Kolhapur Thunderstorm Heavy Rain Diwali Season Sugarcane Impact
पावसाळी दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीवर विरजण; चार दिवस राज्यभर सरींचा अंदाज

आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि…

marathwada heavy rain
मराठवाड्याचे अश्रू… मुख्यमंत्र्यांचे नक्राश्रू! प्रीमियम स्टोरी

पुराने मराठवाड्याला तडाखा दिला असता सरकारने ‘पॅकेज’ हा चमकदार शब्द वापरून, मोठे आकडे दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत…