scorecardresearch

शिवसेना News

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Girish Mahajan's tactics... moves to trap Shinde group in Jalgaon
गिरीश महाजनांचे डावपेच… जळगावात शिंदे गटाला कोंडीत पकडण्याच्या हालचाली

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना आधीच घरातून बहीण वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान होते.

shiv sena shetkari kamgar paksha news in marathi
VIDEO : अन् शिवसेना – शेकापच्‍या महिला आघाडीत हातघाई झाली, जाणून घ्या काय आहे प्रकार

मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला.

BJP leader Vijaykumar Gavit targets Shiv Sena Shinde group and Congress ahead of Nandurbar polls
Video : “काँग्रेस, शिवसेना शिंदे गटाचे नेते चोर…” भाजपचे डाॅ. विजयकुमार गावित कोणाला म्हणाले ?

नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

Shiv Sena (Shinde group) workers on the road for cleaning drains
Mumbai Heavy Rain Alert शिवसेनेचे (शिंदे गट) कार्यकर्ते नालेसफाईसाठी रस्त्यावर; मानखुर्द येथील शीव – पनवेल महामार्गाचे सेवा रस्ते जलमय

Heavy Rainfall in Mumbai :मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून…

Ajit Pawar's statement creates confusion among office bearers
नाशिक पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतून राष्ट्रवादी…अजित पवार यांच्या विधानाने पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आग्रही आहेत. तीनही पक्ष अडून बसल्याने नाशिक पालकमंत्रीपदाचा प्रश्न अजूनही…

Announcement of 'Ladki Sun, Suraksha Sun' campaign... Information from Deputy Chief Minister Shinde
लाडकी बहीण योजनेनंतर ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियानाची घोषणा.., शुभारंभानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी ‘ खेळ मंगळागौरीचा २०२५’ हा कार्यक्रम रविवारी ठाण्यात आयोजित केला होता.…

Jalgaon rally of ajit pawar ncp draws attention with empty chairs
खुर्च्या जास्त झाल्या की कार्यकर्ते कमी पडले… जळगावमधील अजित पवार गटाचा मेळावा चर्चेत

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा अजित पवार येणार असल्याने या मेळाव्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात खुर्च्या जास्त…

Shiv Sena Shinde faction regains control of Jalna cooperative society with opposition support
जालना : खरेदी-विक्री संघ निवडणूक; भाजपला बाजूला ठेवून पाच पक्ष एकत्र

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षास बाजूला ठेवून दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या…

Eknath Shinde empowered his beloved sisters - Gulabrao Patil
“एकनाथ शिंदे यांच्यामुळे नवरे बायकांकडे…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचे अजब विधान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिंदे गटाच्या वतीने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम शहरातील माळी मंगल कार्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पाच हजारांहून…

ताज्या बातम्या