scorecardresearch

शिवसेना News

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Kalwant Singh Sahota Ulhasnagar Standing Committee Chairman | Ulhasnagar Municipal Corporation election updates | Shiv Sena leader Kalwant Singh Sahota | Ulhasnagar Mahapalika Vishay Samiti selection
‘‘स्थायी”च्या सभापतीपदी कलवंत सिंग सहोता; सत्ताधाऱ्यांकडून अखेर नावावर शिक्कामोर्तब, एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड

उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे कलवंत सिंग सहोता यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून…

Shiv Sena Shinde group party entry Khed Ratnagiri | Yogesh Kadam with new party workers | Khed political news update | Thackeray group workers join Eknath Shinde Sena
खेड तालुक्यात ठाकरे गटाला धक्का; घेरारसाळगडमधील ग्रामस्थांचा सामूहिक शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील घेरारसाळगडमधील अनेक ग्रामस्थांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Gajanan Patil Shiv Sena Kalyan Rural Taluka Pramukh | Shrikant Shinde appointing Gajanan Patil | Shiv Sena Shinde Group Kalyan Nilje Corporator | Kalyan Rural political news updates
​खासदार श्रीकांत शिंदेंची मोठी खेळी; सभापती पद हुकलेले गजानन पाटील कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख पदी

देवदर्शनामुळे सभापतीपदाची संधी हुकली असली तरी शिवसेनेने गजानन पाटील यांना तालुकाप्रमुख पदाची ताकद देऊन पक्षनिष्ठेचा योग्य सन्मान केल्याची भावना शिवसैनिकांकडून…

Rahul Bari joins Shiv Sena Shinde Group | BJP Jalgaon crisis Girish Mahajan | Maharashtra Political News Updates | Operation Tiger Shiv Sena BJP rivalry
‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरु असतानाच… जळगावात शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का !

भाजपचे यावल शहराध्यक्ष राहुल बारी यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली आहे.

Shrikant Shinde Nanded Shiv Sena Meeting | MLA Santosh Bangar aggressive speech | Balaji Kalyankar Nanded North controversy | Shiv Sena internal dispute Marathwada
शिवसेनेच्या आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी; आ.बांगरांचा मंत्र्यांवर तर शिवसैनिकांचा आ.कल्याणकरांवर निशाणा!

नांदेडमध्ये आयोजित शिवसेनेच्या विभागीय बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी स्वपक्षीय मंत्र्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला, तर स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार बालाजी कल्याणकर…

Shrikant Shinde Shivsena meeting Chhatrapati Sambhajinagar | Sanjay Shirsat vs Rajendra Janjal conflict | Shivsena party organization Marathwada | Eknath Shinde group internal politics Maharashtra
सत्तेत राहून अंतर्गत वादामुळे शिवसेनेसमोर वाढीचे आव्हान, खासदार श्रीकांत शिंदे समोर जुन्या वादाला नव्याने फोडणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक. पण जेवढी ताकद तेवढीच अंतर्गत धुसफूस.

Arun Sawant Shinde Sena spokesperson | Marathi language mandatory for taxi drivers | Pratap Sarnaik Transport Minister Maharashtra | Maharashtra Rickshaw Taxi License Rules
परप्रांतीयांनी “प्रसाद” खायला तयार रहा; शिंदे सेनेचा इशारा…

परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून परवाना काढताना जुजबी मराठी बोलणे अनिवार्य असून अन्यथा ‘प्रसाद’ देण्याचा इशारा शिंदे सेनेचे प्रवक्ते…

Krupal Tumane Chandrapur visit news | Shinde Sena factionalism in Chandrapur | Maharashtra Political News Today | Eknath Shinde Shiv Sena internal dispute
शिंदे सेनेला गटबाजीचे ग्रहण! संपर्क प्रमुखाच्या तीन वेगवेगळ्या बैठका

चंद्रपुरात शिंदे यांच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले असून संपर्क प्रमुख आमदार कृपाल तुमाने यांना एकाच जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या बैठका घेण्याची…

Sanjay Nirupam Shiv Sena Shinde Group Nagpur | Eknath Shinde vs BJP Nagpur Politics | Nagpur Municipal Corporation Election Updates | Sanjay Nirupam Nagpur Sampark Pramukh
संजय निरुपम यांच्या खांद्यावर शिंदे सेनेचा नागपूर प्रयोग

नागपूर हे शहर जेवढे भारतीय जनता पक्षासाठी महत्वाचे सत्ताकेंद्र आहे, तेवढेच ते त्यांच्या मित्रपक्षासाठीही या शहरात राजकीय ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने…

Eknath Shinde Satara Visit | Maharashtra Deputy CM on Operation Tiger | Shiv Sena UBT MPs Meeting Rumors | Political News Maharashtra
VIDEO : ठाकरे गटाच्या खासदारांसोबतच्या बैठकीचे वृत्त निराधार – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांसोबतच्या कथित गुप्त बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा केवळ अफवा…

Operation Tiger Shiv Sena politics
Eknath Shinde Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’बाबत शिवसेनेचे मंत्री नेमकं काय म्हणाले? एकनाथ शिंदेंकडून कोणता खुलासा? वाचा ५ महत्वाची वक्तव्ये

Operation Tiger राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ८ खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या…

comedian Kunal Kamra On Eknath Shinde
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हटल्याबाबत कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार, विशेषाधिकार समितीसमोर म्हणाला…

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून केलेल्या ‘गद्दार’ टीकेबद्दलही माफी मागण्यास कुणाल कामराने नकार दिला आहे.

ताज्या बातम्या