शिवसेना Photos

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Kunal kamra get interim protection from Bombay high court
9 Photos
कुणाल कामराच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात काय केला युक्तिवाद? अटकेला स्थगिती देताना कोर्ट काय म्हणाले?

यात कुणाल कामराच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला मुंबईत जबाब नोंदवायला का बोलवता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांना…

Kunal Kamra Controversies
10 Photos
पंतप्रधान मोदींपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत; कॉमेडियन कुणाल कामरा आतापर्यंत ‘या’ मोठ्या वादांमध्ये अडकला आहे….

Controversies of comedian kunal kamra: विनोदी कलाकार कुणाल कामरा सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे.…

Maharashtra assembly results 2024 women winner candidates and there constituencys
24 Photos
महाराष्ट्रातील ‘या’ २१ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदारांच्या हाती

Maharashtra Assembly Results 2024 : राज्यामध्ये २१ मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. कोणते आहेत हे मतदारसंघ ज्यांचे नेतृत्व आता…

Maharashtra Assembly Election Results 2024 MLA Income
12 Photos
Photos: काँग्रेसचा ‘हा’ आमदार सर्वात गरीब; अजित पवारांचे सर्वच आमदार कोट्यधीश, भाजपच्या आमदारांची संपत्ती किती?

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजधानीत घडामोडींना वेग आला आहे.

How many candidates of these parties are millionaires Maharashtra assembly election 2024
12 Photos
विधानसभा निवडणुकीत करोडपती उमेदवारांची संख्या मोठी, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्यधीश?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत?, याबद्दल जाणून घेऊयात.

Balasaheb Thackeray Death Anniversary photos, balasaheb thackeray memorial day photos
10 Photos
Photos: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन!

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेय. आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री…

milind deora worli candidate
9 Photos
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

Who is Milind Deora : देवरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या…

eknath shinde dasara melava mumbai azad maidan
23 Photos
Photos : ‘असा’ झाला शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, उबाठा गट व महाविकास आघाडीबद्दल भाषणात नेमकं काय म्हणाले?

Shivsena Dasara Melava Aazad Maidan 2024 Photos : दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना…

eknath shinde lalbaugcha raja darshan photo
9 Photos
Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब ‘लालबागचा राजा’चरणी नतमस्तक, बाप्पाकडे काय मागितलं?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं.

sharad pawar on cm formula maharashtra
10 Photos
Sharad Pawar On Cm Formula : मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “१९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी…”

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत. 

ताज्या बातम्या