scorecardresearch

शिवसेना Videos

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Gulabrao Patil gave response to Sanjay Rauts allegations over shivsena party
Gulabrao Patil: संजय राऊतांच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Gulab Patil: गुलाबराव पाटलांच्या खात्यात कुठूनतरी ४० ते ५० कोटी रुपये जमा झाले होते. ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते.…

Poster war between Shivsena thackeray group and Shinde group in Pune
Shivsena Banner War।पुण्यात शिवसेना उबाठा गट आणि शिंदे गट यांच्यात पोस्टर वॉर, राजकारण पेटलं !

शिवसेना वर्धापन दिनाच्या पाश्वभूमीवर पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार बॅनरबाजीचं युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. काल २२ जून…

Bharat Gogavale in trouble again due to Aghori Puja
Bharat Gogawale Aghori Puja Video: अघोरी पूजेमुळे भरत गोगावले पुन्हा अडचणीत? नेमकं प्रकरण काय?

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले…

What are the political implications of Chandrahar Patils entry into the Shinde faction
Chandrahar Patil Join Shivsena: चंद्रहार पाटलांच्या शिंदे गटातील प्रवेशाचे राजकीय पडसाद काय?

डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी सोमवारी (९ जून) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हे तेच चंद्रहार पाटील आहेत…

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil enters Eknath Shindes Shinde group
Chandrahar Patil: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

Chandrahar Patil: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत…

Shivsena Shinde Group and Thackeray Group workers Protest at Kalyan Durgadi Fort
Shivsena Protest at Kalyan: कल्याणमध्ये शिंदे-ठाकरे गटाकडून घंटा नाद आंदोलन, पोलीस बंदोबस्त तैनात

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज दोन्ही शिवसेनेकडून ‘घंटा नाद’ आंदोलन केलं जात आहे. हे…

Eknath Shinde made a big statement over jammu kashmir attack in kolhapur
Eknath Shinde: “पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त होणार…”; कोल्हापुरात शिंदे थेटच बोलले

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व संग्रहालय लोकार्पण सोहळा काल (5 मे) जयसिंगपूर येथे पार पडला. या…

detail information about Navi Mumbai School Case
Navi Mumbai School Case: बस चालकाकडून मुलावर अत्याचार, मुख्याध्यापकांवरही कारवाईची मागणी

नवी मुंबईतील एका शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या…

ताज्या बातम्या