scorecardresearch

सर्वोच्च न्यायालय News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
Supreme Court On Stray Dogs : दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांत पकडा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

दिल्ली-एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्रांना शेल्टरमध्ये हलवण्याच्या आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Guardian Minister Shri. Desai reviewed the preparations for Ganeshotsav 2025.
साताऱ्यात गणेशोत्सवात ‘लेझर लाईट’वर बंदी; शंभूराज देसाई यांचे आदेश

सातारा जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवात तीव्र प्रकाश यंत्रणेवर(लेझर लाईट) पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या ‘लेझर लाईट’मुळे…

Jitendra Awhad's reaction to the election scam
Jitendra Awhad : “असा त्यांचा कट होता, अन् झालेही तसेच “, निवडणूक घोटाळ्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार…

Surendra gadling elgar case supreme court urgent hearing
गडलिंग यांच्या जामिनावरील स्थगितीची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल…

सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावरील सुनावणी ११ वेळा पुढे ढकलल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्याचे आदेश दिले…

Allahabad High Court case, Supreme Court decision, contempt of court, civil vs criminal cases, legal process in India, judicial comments India,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधातील टिप्पणी मागे, सरन्यायाधीशांच्या हस्तक्षेपानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणात फौजदारी कारवाईस परवानगी दिल्याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्याविरोधात टिप्पणी करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश भूषण…

ED should learn a lesson now... Chhagan Bhujbal's criticized work ethic
‘ईडी’ ने आता तरी धडा घ्यावा… छगन भुजबळ यांचे कार्यपद्धतीवर बोट

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने २०१६ मध्ये अटक केली होती.

Sambhajinagar finally recommends candidates for 39 Deputy Education Officer posts
अखेर ३९ उपशिक्षणाधिकारीपदांवरील उमेदवारांची शिफारस; एमपीएससीकडून शिक्षण विभागाला पत्र

शिफारसपत्रात म्हटले आहे की, प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरत असलेल्या उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ…

Supreme Court, cash hoarding case, Justice Yashvant Verma petition, Alahabad High Court inquiry, cash stash investigation, legal process Supreme Court,
‘तुमचे वर्तन प्रेरणादायी नाही’, न्या. वर्मांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीला आव्हान देणारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून…

supreme court tells ed to act within law not drama
भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीतच काम करा, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला बजावले

सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) भामटेपणा न करता कायद्याच्या चौकटीतच काम करावे असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बजावले.

ताज्या बातम्या