scorecardresearch

सर्वोच्च न्यायालय News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
first elections conducted using EVMs
EVM वापरून झालेल्या पहिल्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या रद्द, नेमके काय घडले होते?

केंद्र सरकारने मशिन्सच्या वापरास मान्यता दिली नाही, परंतु ECI ने कलम ३२४ अंतर्गत आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर केला, ज्यामुळे त्यांना…

case of accommodating contract workers Municipal administration rushes after Supreme Court order
कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची धावपळ

कंत्राटी कामगार म्हणून सगल २४० दिवस भरल्यास कामगारांना कायम करणे बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अखेर मुंबई महापालिकेने…

The Supreme Court held that the acceptance of resignation does not terminate the employment
राजीनाम्याच्या स्वीकृतीने नोकरी समाप्तच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा प्रीमियम स्टोरी

कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर ज्या तारखेला योग्य अधिकाऱ्याने राजीनामा स्वीकारला असेल त्या तारखेपासून नोकरी समाप्त झाल्याचे मानले जाईल असा निर्वाळा सर्वोच्च…

Supreme Court notice to Election Commission to hold fresh poll if NOTA gets more votes
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास नव्याने मतदान घेण्याविषयी विचारणा

उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास त्या विशिष्ट मतदारसंघाचा निवडणूक निकाल रद्द करून नव्याने मतदान घ्यावे का, अशी विचारणा करणारी नोटीस…

supreme court on NOTA (1)
NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकाराधिकाराचा अर्थ

एखाद्या मतदारसंघात नोटा या पर्यायाला सर्वाधिक मते मिळाल्यास नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका लेखक आणि प्रेरक वक्ता शिव खेरा…

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश

या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांची बाजू वरिष्ठ वकील गोपाल एस. यांनी मांडली. यावेळी बोलताना त्यांनी खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याच्या निर्णयाला तीव्र…

VVPat, Supreme Court, VVPat Verification,
विश्लेषण : १०० टक्के व्हीव्ही पॅट पडताळणीस नकार… सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणखी काय सांगतो? 

यंत्रणेवर विश्वास आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांचे सहकार्य असले पाहिजे. उगाच संशय घेणे, चुकीचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात…

dy chandrachud voting appeal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मतदारांना मराठीतून आवाहन; म्हणाले, “या खेपेला…”

संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत. त्यापैकी मतदान करणे हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे, तसेच ते आपले कर्तव्यही आहे, असे…

Supreme Court Notice To Election Commission on NOTA
‘नोटा’ला सर्वाधिक मतदान झाल्यास काय होणार? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

मतदान यंत्रावरील नोटा पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झाले तर त्या मतदारसंघात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक…

supreme court verdict evm vvpat
EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; न्यायमूर्ती म्हणाले…

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.

supreme court
सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन; व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खटले, सूचीबद्ध प्रकरणांची माहिती

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी डिजिटायझेशनच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, गुरुवारी सर्वोच्च न्यायालय व्हॉट्सअ‍ॅप संदेशांद्वारे वकिलांना खटले दाखल करणे आणि…

ताज्या बातम्या