scorecardresearch

ठाणे

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
shiv sena eknath shinde
स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीचा भगवा फडकवायचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे…

Dhokali area of ​​Thane sudden disappearance of 50 year old temple with its idol
ठाण्यात ५० वर्षांचे मंदिर मूर्तीसह गायब ! पोलिस तक्रार घेईना, ग्रामस्थांनी घेतली भाजप नेत्याची भेट

ठाण्यातील ढोकाळी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायलँड पार्क रोडवरील सुमारे ५० वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर अचानक मूर्तीसह…

crime
डोंबिवलीत मालवण किनारा हाॅटेल बाहेर धक्का लागल्याच्या कारणातून तरूणाचा खून

डोंबिवली एमआयडीसीतील मालवण किनारा हाॅटेलमध्ये प्रवेश करताना एका तरूणाचा दुसऱ्या ग्राहकाला धक्का लागला. या विषयावरून चार जणांनी धक्का देणाऱ्या इसमाशी…

thane station platform 2 3 and 4 extensions 15 car trains run from december 31
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक २,३ आणि ४ वरुन लवकरच १५ डब्यांची लोकल धावणार; खासदार नरेश म्हस्के यांची ग्वाही

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक २,३ आणि ४ वरची फलाट लांबीचे काम प्रगतीपथावर असून येत्या ३१ डिसेंबर पासून या तीनही फलाटांवर…

rajyabhishek samaroh sanstha in thane held fort building contest
दुर्ग बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात, सोहळ्यावेळी शिवकालीन शस्त्रे, नाणी, चलन प्रदर्शन; राज्यभिषेक समारोह संस्थेचा उपक्रम

ठाणे येथील राज्यभिषेक समारोह संस्थेच्यावतीने ऐतिहासिक गडकिल्ल्यांची जोपासना आणि परंपरेचे संवर्धन यानिमित्त दुर्ग बांधणी स्पर्धा आयोजित केली जाते.यंदा या स्पर्धेत…

high court
मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी सुनावणी

मुंब्रा येथील रेल्वे अपघातात उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभियंत्यांनी अंतरिम अटक पूर्व जामीनासाठी किलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज…

Ration Card
शहापुरात सरकारी धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश,६९५ क्विंटल तांदूळ जप्त, गोदाम मालकावर गुन्हा दाखल

शहापुर तालुक्यातील रेशन दुकानासाठी निघालेले धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्न खासगी गोदामात तब्बल ६९५ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला.…

four men beat vadapav vendor and his two companions in Kalyan
‘मराठी येत नाही का’ विचारून कल्याणमध्ये वडापाव विक्रेत्यांना बेदम मारहाण

‘काय रे तुम्हाला मराठी बोलता येते की नाही,’ असे विचारणा करून वडापाव विक्रेत्यासह त्याच्या दोन साथीदारांना चार जणांनी रविवारी रात्री…

thane anganwadi empowerment team to improve children nutrition through anganwadi
जिल्ह्यात ” अंगणवाडी सक्षमीकरण टीम ”

ठाणे जिल्ह्यातील बालक आणि मातांच्या पोषण स्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून योग्य आहार मिळावा यासाठी…

developers charging unreasonable fees every month dombivli residents protested on suday
पलावा खोणी क्राऊन येथील रहिवासी दुहेरी देखभाल शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर

विकासक रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारत असल्याने डोंबिवली जवळील पलावा वसाहतीमधील खोणी क्राऊन येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करत रविवारी रस्त्यावर…

social media memes erupt over thane shiv sena leader Dipesh Mhatre joins bjp
भाजपमध्ये प्रवेश होताच दीपेश म्हात्रे झाले ट्रोल, सोशल मीडियावर ‘फिरता वर्ल्डकप’ची जोरदार चर्चा

Dipesh Mhatre : डोंबिवली जिमखान्यात झालेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांचा भाजप प्रवेश पार पडला.

संबंधित बातम्या