scorecardresearch

तृणमूल काँग्रेस Videos

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) प्रामुख्याने सक्रिय असणाऱ्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाची स्थापना १ जानेवारी १९९८ रोजी झाली. सध्याच्या प. बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. २६ वर्ष कॉंग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र जाण्याचा विचार करत तृणमूल काँग्रेस पक्षाची (TMC) स्थापना केली.

२०१६ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. टीएमसीचे (TMC) लोकसभेमध्ये २३ तर, राज्यसभेमध्ये १३ सदस्य आहेत. तसेच संसदेमध्ये २३० आमदार असलेला हा तिसऱ्या क्रंमाकाचा मोठा पक्ष आहे. जोरा घास फुल (दोन फुलं आणि गवत) हे या पक्षाचे चिन्ह आहे. १९९८च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टीएमसीचे ७ उमेदवार निवडून आले आणि हा पक्ष वाजपेयी सरकारमध्ये सहभागी झाला. पुढे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपसह 8 जागा जिंकल्या. २००० साली कोलकाता महानगरपालिकेवर या पक्षाची सत्ता आली. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत टीएमसी ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला.

२००४ व २००६ साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेले नुकसान पाहून त्यांनी एनडीए (NDA) सोडण्याचा निर्णय घेतला. बंगालमधील नंदीग्राममध्ये एका प्रकल्पासाठी तब्बल ७०,००० लोकांना स्थलांतर करावे लागणार होते. याला तृणमूल काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला. एकूण प्रकरणाचा फायदा पक्षाला २००९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. १९ जागा जिंकत ममता बॅनर्जी केंद्रीय रेल्वेमंत्री बनल्या.

२०११ ते २०२१ अशा दहा वर्षांमध्ये सलग विजय मिळवत ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखली आहे. २०२१ च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण शक्ती लावूनही भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. पण यावेळी त्यांना टीएमसीच्या मुकुल रॉय आणि सुवेंदू अधिकारी अशा मोठ्या नेत्यांना परभूत करण्यात यश मिळाले.
Read More
MP Derek O'brien Suspended From Rajya Sabha
MP Derek O’brien Suspended From Rajya Sabha: तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांचं राज्यसभेतून निलंबन!

बुधवारी (१३ डिसेंबर) दोन तरुणांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात शिरून सुरक्षाभंग केला होता. या प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली. यावरून आता विरोधक…

ताज्या बातम्या